आपलं शहरफेमसभुक्कड

Bird Flu; चिकन, अंडी खावेत की नाही यावर बघा काय सांगतात तज्ञ

देशभरातील सहा ते सात राज्यात बर्ड फ्लूने आपले जाळे पसरवले असून आता महाराष्ट्रातील अनेक जिल्ह्यात बर्ड फ्लूची चिन्हे दिसली आहे. महाराष्ट्रातील अनेक जिल्ह्यात मृत पक्षी आढळत असून मुंबई ठाण्यासह इतर राज्यात बर्ड फ्लूचा धोका वाढला आहे. आता बर्ड फ्लू वरून थेट प्रश्न हा चिकन मटण खावे की नाही यावर येऊन पोहचला आहे. यावर वंटास मुंबईने तज्ञांचे मत जाणून घेतले आहे.

बर्ड फ्लू विषाणूचा अंश हा मुख्यतः संसर्ग झालेल्या पक्ष्‍यांच्‍या श्‍वसननलिका व अन्‍ननलिकेमध्‍ये आढळून येतात. सेंटर्स फॉर डिसीज कंट्रोल अॅण्‍ड प्रीव्‍हेन्‍शनच्या (Centers for Disease Control and Prevention) मते, बर्ड फ्लूची मानवामध्ये संक्रमण होण्‍याची शक्‍यता दुर्मिळच आहे. चिकन व इतर पोल्‍ट्री उत्पादने योग्‍यरित्‍या शिजवल्‍यास खाण्‍यासाठी सुरक्षित आहेत, असे संयुक्‍त निवेदन युएन फूड अॅण्‍ड अॅग्रीकल्‍चर ऑर्गेनायझेशन (FAO) आणि जागतिक आरोग्‍य संघटना (WHO) यांनी राष्‍ट्रीय अन्‍न सुरक्षा प्राधिकरणांना जारी केले.

70 अंश सेल्सिअसमध्‍ये किंवा त्‍यापेक्षा अधिक तापमानामध्‍ये उत्‍पादनाचे सर्व भाग योग्‍यरित्‍या शिजवल्‍यास त्‍यामधील विषाणू निष्क्रिय होतील. जेवण तयार करताना शिजवलेल्‍या व कच्‍च्‍या मांसांसाठी समान भांडी वापरू नका. कच्‍च्‍या पोल्‍ट्रीची हाताळणी करण्‍यापूर्वी आणि केल्‍यानंतर हात साबण व पाण्‍याने स्‍वच्‍छ धुणे आवश्‍यक आहे. पोल्‍ट्रीमध्‍ये प्रादुर्भाव पसरलेल्‍या भागांमधून पोल्‍ट्री कच्‍च्‍या किंवा अर्धे शिजवलेल्‍या स्‍वरूपात म्‍हणजेच अंड्यातील बलक कच्‍चे राहत असते त्याचे सेवन करू नये, असा सल्‍ला FAO आणि WHO यांनी दिला अनम गोलंदाज (आहारतज्ञ, मसिना हॉस्पिटल) यांनी सांगितले.

याशिवाय अंडी चिकन यामधूनही बर्ड फ्ल्यू पसरण्याची शक्यता अगदी कमी आहे, कारण आपल्या खाद्यसंस्कृती मध्ये आपण चिकन, मटन, अंडी किंवा भाज्या उकडून शिजवून खातो. त्यामुळे या तापमानाला हा विषाणू जिवंत राहू शकत नाही. निर्धास्तपणे चिकन अंडी खा! खवय्या लोकांनी घाबरण्याचं कारण नाही.

– डॉ अजित रानडे, अधिष्ठाता,
मुंबई पशुवैद्यकीय महाविद्यालय

Related Articles

Subscribe
Notify of
guest
0 Comments
Inline Feedbacks
View all comments