खूप काहीकारण

भंडाऱ्यात भाजपचा राज्य सरकारविरोधात मोर्चा; देवेंद्र फडणवीसांचा आक्रमक पवित्रा

मुंबईत आझाद मैदानावर शेतकऱ्यांचं केंद्र सरकार विरोधात आंदोलन सुरु असताना दुसरीकडे भंडाऱ्यात देखील देवेंद्र फडणीस हे राज्य सरकारविरोधात रस्त्यावर उतरले आहेत. शेतकऱ्यांच्या व कामगारांच्या विविध मागण्यांसाठी भाजपतर्फे हा मोर्चा काढण्यात आला आहे. परिणय कुके आणि नगरसेवक चंद्रशेखर बावनकुळे यांच्या नेतृत्वाखाली हा मोर्चा काढण्यात आला आहे.

“राज्य सरकार शेतकऱ्यावर अन्याय करत आहे. हा शेतकऱ्याचा रोष आहे. शेतकऱ्यांच्या अन्यायाला वाचा फोडण्याकरिता आम्ही सगळ्यांना रस्त्यावर उतरवलं आहे.वीलबिलासंदर्भात राज्यसरकारने शेतकऱ्यांची फसवणूक केली आहे. बेमानी केली आहे. धान्य उत्पादक शेतकऱ्यांची धान्य खरेदीत फसवणूक होते आहे. दूध उत्पादक शेतकऱ्यावर योग्य किंमत न देता आघाडी सरकारने अन्याय केला आहे. त्या विरोधात हा मोर्चा आहे,” असे प्रतिपादन देवेंद्र फडणवीस यांनी केले आहे.

“भंडाऱ्यातील एक दुर्घटनेत १० बालकांचा जळून मृत्यू झाला, परंतु त्यासंदर्भात कोणतीही कारवाई करण्यात आली नाही. इथे असलेले सर्व शेतकरी आहेत तर आझाद मैदानावर आदिवासींना आणण्यात आले आहे. याआधी कोणत्याही शेतकऱ्यांनी कोणत्याही कायद्या विरोधात आंदोलन केलेलं नाही. कंत्राटी शेतीचा कायदा किंवा बाजार समितीच्या बाहेर माल विकण्याचा कायदा असे सर्व कायदे महाराष्ट्रात २००६ पासून लागू आहेत. हा सर्व ढोंगी पणा आहे. महाराष्ट्रात सर्व कायदे लागू असताना केंद्राने केलेल्या कायद्याविरोधात आंदोलन करायचं असा ढोंगीपणा सरकार करतय”, असा आरोप देखील त्यांनी केला आहे.

Related Articles

Subscribe
Notify of
guest
0 Comments
Inline Feedbacks
View all comments