आपलं शहर

BKC Jumbo Vaccination Centre : एका दिवसाला 2400 जणांना लस, लसीकरण केंद्र सज्ज

आजच्या लसीकरणच्या ड्रायरनसाठी बिकेसीमधील लसीकरण केंद्र सज्ज झालं आहे. लसीकरणाच्या आधी या ठिकणी ड्राय रन म्हणजेच रंगीत तालीम केली जाणार आहे. डॉक्टर्स आणि आरोग्य कर्मचाऱ्यांकडून पूर्ण तयारी करण्यात आली आहे. (BKC Jumbo Vaccination Center: Vaccination center ready for 2400 people a day)

कोव्हीन अॅपमध्ये नोंदणी केलेल्या 25 लाभार्थी या ठिकणी लसीकरणच्या ड्रायरनमध्ये सहभागी होणार आहेत.

बिकेसी लसीकरण केंद्रात प्रत्यक्ष लसीकरण सुरु झाल्यानंतर एकावेळी 15 व्हॅक्सिनेशन रुममध्ये 15 लाभार्थ्यांना लस दिली जाणार आहे. त्यासाठीची रंगीत तालीम आज होणार आहे. या रंगीत तालीममध्ये रुग्णांना हाताळणे, त्यांचे रजिस्ट्रेशन करुन घेणे, त्यांना लस देणे, लस दिल्यानंतर रुग्णांवर नियंत्रण ठेवणे अशा अनेक गोष्टींचे प्रशिक्षण वैद्यकीय अधिकाऱ्यांना दिलं जाणार आहे.

या ठिकाणी दिवसाला अडीच हजारांच्या जवळपास लाभार्थ्यांना लस देण्याचं आव्हान असणार आहे. त्यासाठी मोठी वेटिंग रूम, 7 रजिस्ट्रेशन काऊंटर, 15 व्हॅक्सिनेशन सेंटर, ऑब्जर्व्हेशन सेंटर, मोनिटरिंग रूम (ज्या ठिकाणी लस दिल्यानंतर त्रास झाल्यास उपचार केला जाणार) आशा प्रकारे तयारी करण्यात आली आहे.

रुग्णांना अथवा स्वयंसेवकांना लसीकरणानंतर त्रास झाल्यास तातडीने मोनिटरिंग रूममध्ये उपचार केले जातील, सोबतच या ठिकाणी आयसीयूची सोयसुद्धा असणार आहे.

एकूण 90 डॉक्टर्स आणि आरोग्य कर्मचारी या जम्बो लसिकरण केंद्रामध्ये काम करतील.

Related Articles

Subscribe
Notify of
guest
0 Comments
Inline Feedbacks
View all comments