खूप काहीफेमस

शेतकऱ्यांना आतंकी म्हणणं कंगनाला पडलं महागात, 6 ब्रंड्सने दिला दणका

सोशल मीडियावर शेतकऱ्यांच्या आंदोलनांचा मोठ्या प्रमाणात विरोध केला जातोय. सरकारच्या समर्थनात स्वतःचा आवाज बुलंद करणारी अभिनेत्री कंगना रणावतनेही स्वतःची नाराजगी जाहीर केली आहे.

72 व्या प्रजासत्ताकदिनी जेव्हा देशात सगळीकडे उत्साहाचा माहोल होता, तेव्हाच दुसरीकडे शेतकऱ्यांच्या ट्रॅक्टर रॅलीच्या आंदोलनाने हांगमा केला. शेतकरी आणि पोलिसांमध्ये खुप संघर्ष झाला. याचदरम्यान लाल किल्ल्यावर निशाण साहेबचा झेंडा शेतकऱ्यांनी फडकवला.

त्यानंतरच देशभरात हा चर्चेचा विषय बनला आहे. सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात याचा विरोध दिसतोय. सरकारच्या समर्थनात स्वतःचा आवाज बुलंद करणाऱ्या अभिनेत्री कंगनानेदेखील या प्रकरणात उडी घेतली आहे.

यानंतर आनंद रंगनाथननेही शेतकऱ्यांची ट्रॅक्टर रॅली आणि निशाण साहेबचा झेंडा फडकवला गेला, त्यावर मत मांडलं आहे. तिरंग्याच्या जागी बेकायदेशीर ध्वज फडकवणे, जितके वाटते तितके सोपे नाही. याच्यामागे एक प्रबळ मानसिकता आहे, हे चांगले संकेत नाहीत. हे एखाद्या ठिकाणी कब्जा करण्यासारखे आहे. मी अस होईल, असा विचारदेखील कधी केला नव्हता. नरेंद्र मोदीजी तुम्ही पण तितकेच रागात आहात का, जितके आम्ही आहोत, असा सवाल आनंद यांनी केला आहे.

कांगणाचं नुकसान

यावर कंगना रानौतने शेतकरी आंदोलनावर केलेल्या विधानामुळे 6 ब्रँड्सने तिच्यासोबतच्या पार्टनरशिपमधून काढता पाय घेतला आहे. शेतकरी आंदोलनावर बोलल्यानंतर 6 ब्रँड्सने माझ्यासोबत कॉन्ट्रॅक्ट तोडले आहे, असे दिने स्वत:हून घोषित केलं आहे. काहींसोबतचे कॉन्ट्रॅक्ट आधीपासूनच सुरु होते आणि त्यातले काही कॉन्ट्रॅक्ट आता सुरु होणार होते, अशा 6 ब्रॅंड्सने माझ्यासोबत कॉन्ट्रॅक्ट रद्द केल्याचे कंगनाने सांगितले आहे.

ब्रँड्स अनुसार मी शेतकऱ्यांना आतंकवादी बोलले म्हणून ते मला त्यांच्या ब्रँड्सचे प्रतिनिधी नाही बनवू शकत.आज मी या देशाच्या प्रत्येक नागरिकाला सांगू इच्छिते, जो या निषेधाचे समर्थन करत आहे की ते देखील दहशतवादी आहेत. त्यामुळे नकळत ब्रॅंड्सलाही कंगनाने दहशतवादी म्हणून घोषीत केले आहे.

Related Articles

Subscribe
Notify of
guest
0 Comments
Inline Feedbacks
View all comments