आपलं शहरकारण

सर्वसामान्यांसाठी लोकल सेवा सुरू करू शकतो? पण… – रेल्वे अधिकारी

सर्वसामान्य मुंबईकरांसाठी लोकलचे दरवाजे कधी उघडणार हा प्रश्न गेल्या कित्येक महिन्यांपासून विचारला जात आहे. उच्च न्यायालयातही याप्रकरणी सुनावणी सुरू असून, लोकलच्या निर्णयाचं भिजत घोंगडे कायम आहे.

दरम्यान, सर्वसामान्यांसाठी लोकल सेवा सुरू करण्यासंदर्भात मध्य रेल्वेच्या अधिकाऱ्यांनी महत्त्वाची माहिती दिली आहे. लोकल सेवा सुरू करण्यास मध्य रेल्वे सज्ज असल्याचं सांगत अधिकाऱ्यांनी कारणांचा उलगडा केला आहे. मध्य रेल्वेचे महाव्यवस्थापक संजीव मित्तल यांनी सर्वसामान्यांसाठी लोकल सेवा सुरू करण्याबद्दल इंडियन एक्स्प्रेसला माहिती दिली. सर्वसामान्यांसाठी लोकल सुरू करण्यासाठी रेल्वे प्रशासन सज्ज आहे.मात्र यासंदर्भात पुढील निर्णय घेण्यासाठी राज्य सरकारच्या परवानगीची प्रतीक्षा करत आहे.

लोकलमध्ये होणाऱ्या गर्दीमुळे राज्य सरकारला काळजी वाटते आणि त्यामुळे राज्यात पुन्हा रेल्वेगाड्या सुरू करण्याचा विचार सरकार करत आहे. मध्य रेल्वेने एक किंवा इतर पर्यायांनी गाड्या सुरू केल्या आहेत आणि राज्य सरकारने सर्वसामान्यांना लोकलमधून प्रवासाची मूभा दिल्यानंतर लवकरच पूर्ण क्षमतेने लोकल धावतील.

लॉकडाउन होण्याआधी मध्य रेल्वेकडून १७७४ लोकल गाड्या चालवल्या जात होत्या. त्यापैकी काही बंधनं पाळून १५८० गाड्या पुन्हा धावत सुरू करण्यात आल्या आहेत. राज्य सरकारबरोबर रेल्वेचा चांगला समन्वय आहे. हळूहळू रेल्वे सेवा पूर्वपदावर आणण्यासाठी पर्याय स्वीकारण्यात आले आहेत. मुंबईतील लोकल रेल्वेबद्दल बोलायचं झालं, तर आतापर्यंत २० श्रेणीतील प्रवाशांना लोकलमधून प्रवास करण्याची परवानगी देण्यात आली आहे.

Related Articles

Subscribe
Notify of
guest
0 Comments
Inline Feedbacks
View all comments