फेमस

‘चलो बुलावा आया हैं’ फेम गायक नरेंद्र चंचल यांचे निधन

प्रसिद्ध भजन गायक नरेंद्र चंचल यांचे वयाच्या ८० व्या वर्षी निधन झाले आहे. ते मागील ३ महिन्यापासून श्वसनविकाराने त्रस्त झाले होते. त्यांनी अनेक लोकप्रिय भजने गायली होती. आपल्या अनोख्या गायन शैलीने व मधुर आवाजाने त्यांनी अनेक श्रोत्यांना भक्तिमार्गाकडे वळायला भाग पाडले होते. श्रोत्यांच्या हृदयात त्यांचे एक वेगळे स्थान होते. श्वास घेण्यास त्रास होत असल्याने त्यांची प्राणज्योत मालवली असं सूत्रांकडून सांगण्यात आलं आहे.

अचानक छातीत दुखू लागल्याने त्यांना गुरुवारी रात्री दिल्लीमधील एका रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. पंजाब केसरी यांच्या माहितीनुसार त्यांचे अपोलो हॉस्पिटलमध्ये दुपारी १२ दरम्यान निधन झाले. प्रसिद्ध गायक दलेर मेहंदी आणि भारताचा क्रिकेटपटू हरभजन सिंग यांसोबत अनेक दिग्गजांनी त्यांना श्रद्धांजली वाहिली आहे. मागील ३ महिन्यांपासून त्यांच्यावर श्वसनासंदर्भात उपचार चालू होते.

नरेंद्र चंचल यांनी त्यांच्या कारकिर्दीची सुरवात अभिनेते ऋषी कपूर यांच्या ‘बॉबी’ या चित्रपटातून केली होती. त्यात त्यांनी ‘बेशक मंदिर मस्जिद तोडो’ हे गाणे गायले होते. त्यांच्या भजनाच्या कार्यक्रमाला देखील प्रचंड गर्दी होत असे. ‘चलो बुलावा आय है, माता ने बुलाय हैं’ या गाण्यातून त्यांना विशेष प्रसिद्धी मिळाली. त्यांच्या जाण्याने कलाविश्वात हळहळ व्यक्त होत आहे.

 

Related Articles

Subscribe
Notify of
guest
0 Comments
Inline Feedbacks
View all comments