फेमस

“चलो ये भी ठीक है!” Mirzapur-2 मधल्या रॉबिनच्या डायलॉगचा धमाकेदार प्रवास…

जेव्हा एखादा चित्रपट किंवा वेब सेरिज बघतो, तेव्हा त्यातली अनेक वाक्य आपल्या डोक्यात सेट होतात. मग त्या शिव्या का असेना, आपण जागोजागी ती वाक्यं वापरायला किंवा चिकटवायला सुरुवात करतो.

अशाच फॉर्मेटमध्ये सेट होत असलेली वेब सेरिज म्हणजे मिर्झापूर. मिर्झापूरमधील अनेक डायलॉग आपण आपल्या दैनंदिन जिवनात वापरत असतो. त्यातलाच एक फेमस डायलॉग म्हणजे “चलो, ‘ये भी ठीक है’! या एका डायलॉगमुळे मिर्झापूरमधला रॉबिन सगळ्यांच्या चर्चेत राहिला.

नेटफ्लिक्स’वर गाजलेल्या ‘एक्स्ट्रॅक्शन’ सिनेमातील क्राईम लॉर्ड ते अॅमेझॉन प्राईमवरील मिर्झापूरच्या दुसऱ्या भागातील साकारलेला रॉबिन म्हणजेच अभिनेता प्रियांशू पैन्युली, त्याच्या या डायलॉगमुळे अनेकांच्या स्टेटसवर झळकत आहे. त्या डायलॉगची नेमकी निर्मिती कशी झाली आणि त्याच डायलॉगला त्याने आपल्या व्यक्तीरेखेमध्ये कशारप्रकारे साकारलं, हे तो स्वत: सांगतो.

काही दिवसांपूर्वीच अभिनेता प्रियांशू पैन्युली ने गर्लफ्रेण्ड वंदना जोशीसोबत लग्न केलं. याच पार्श्वभूमीवर त्याची एक मुलाखत घेण्यात आली, त्यावेळेस त्याने या डायलॉगबद्दल खुलासा केला.

एकदा मी माझ्या मित्रांसोबत रिव्हर राफ्टिंगसाठी गेलेलो. तिथे आमची व्यवस्था करण्यासाठी एक व्यक्ती होती, ते आम्ही काम सांगितल्यानंतर प्रत्येकवेळी ‘चलो, ये भी ठीक है’ असं म्हणाचे. ते वाक्य माझ्याकडे फिट झालं. त्यानंतर मीही कधी कधी त्या वाक्याच्या उपयोग अनेकदा करायचो. मिर्झापूरची मला ऑफर आली, त्यावेळी माझ्या गंभीर व्यक्तीरेखेसाठी अशाच एका वाक्याची गरज होती, आणि त्यावेळेस मला हे वाक्य आठवलं. मी दिग्दर्शकांना याबद्दल सांगितल्यानंतर त्यांनाही हे वाक्य आवडलं. शूटिंगच्या वेळी जेव्हा जेव्हा गरज पडली, तेव्हा तेव्हा मी या वाक्याचा वापर केला, असं अभिनेता प्रियांशू पैन्युली सांगितो.

त्यामुळे तुम्हालाही असे कोणते डायलॉग आवडत असतील, तर आम्हाला कमेंटमधून नक्की कळवा.

Related Articles

Subscribe
Notify of
guest
0 Comments
Inline Feedbacks
View all comments