आपलं शहर

मित्रांनो तयार राहा, मुंबईमधील महाविद्यालये लवकर सुरु होणार

उच्च आणि तंत्रशिक्षण मंत्रालयाने (Ministry of Higher and Technical Education) परवानगी दिल्यानंतर राज्यातील अनेक महाविद्यालये सुरू करण्यात आली आहेत, सोशल डिस्टन्स आणि कोरोनाचे नियम पाळत अनेक शहरातील महाविद्यालये सुरू करण्यात आली आहेत. मात्र अद्याप मुंबईतील कोणतीच महाविद्यालये सुरू करण्यात आली नव्हती, त्यासंदर्भातच आता निर्णय होण्याची शक्यता आहे. (College in Mumbai will start soon)

राज्यातील पाचवी ते आठवी आणि नववी ते 12 वी अशा दोन टप्यात शाळा सुरू झाल्या असल्या तरी मात्र मुंबई यासंदर्भातील निर्णय राखून ठेवला होता. मुंबईतील कोरोना रुग्णांची संख्या आणि शाळांमध्ये होणारी गर्दी लक्षात घेतल्यानंतर मुंबई पालिकेकडून शाळा बंद ठेवण्याचा निर्णय घेतला होता.

आम्ही प्राथमिक, ज्युनिअर तसेच पदवी महाविद्यालयांमधील शेवटच्या वर्गात शिकणाऱ्या विद्यार्थ्यांना वर्गांमध्ये बोलवण्याच्या तयारीत आहोत, सुरुवातीला एका बॅचला आठवड्यातून एकदा वर्गात बोलवलं जाईल, आणि संपुर्ण दिवस त्यांना प्रकटिकलबद्दल शिकवलं जाईल.  त्यानंतर इतर दिवसांमध्ये ऑनलाइन पद्धतीने लेक्चर कसे घेता येतील, याबद्दल नियोजन केले जाईल, अशी माहिती केसी कॉलेजच्या मुख्याध्यापिका हेमलता बागला (dr Hemlata Bagla) यांनी दिली आहे.

मुंबईतील सर्रास महाविद्यालयांनी वर्ग सुरू करण्याची तयारी दर्शवली आहे, आता फक्त शालेय शिक्षण विभाग, उच्च आणि तंत्रशिक्षण विभागाकडून परवानगी दिल्यानंतर लवकरच मुंबईत सर्व प्राथमिक शाळा, महाविद्यालय आणि उच्च महाविद्यालये सुरू करण्यात येतील.

मुंबईतील लोकल सुरू

येत्या 1 फेब्रुवारीपासून मुंबईतील सर्वसामान्यांसाठी लोकल सुरु करणार असल्याची घोषणा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केली आहे. दिवसातील 3 टप्प्यांमध्ये ही सेवा पुरवली जाणार आहे.

सर्वसामान्यांना दरवेळेला प्रवास करणे शक्य नाही, तर पहाटेच्या पहिल्या लोकलपासून सकाळी 7 वाजेपर्यंत सर्वसामान्यांसाठी ही लोकलसेवा पुरवली जाणार आहे. त्यानंतर सकाळी 7 ते दुपारी 12 वाजेपर्यंत फक्त अत्यावश्यक सेवेतील नागरिकांसाठी लोकलसेवा पुरवली जाईल. दुपारी 12 ते सायंकाळी 4 वाजेपर्यंत पुन्हा सर्वसामान्यांसाठी ही सेवा पुरवली जाईल, अशी माहिती मुख्यमंत्र्यांनी काढलेल्या परिपत्रकातून दिली आहे. रात्री 9 पासून शेवटच्या लोकलपर्यंत पुन्हा सर्वसामान्यांसाठी प्रवास करता येईल, असही परिपत्रकामध्ये म्हटलं आहे.

 

Related Articles

Subscribe
Notify of
guest
0 Comments
Inline Feedbacks
View all comments