आपलं शहर

कोरोना लसीकरणाची सुरुवात, पंतप्रधान, मुख्यमंत्र्यांच्या हस्ते उद्घाटन

आजपासून देशभरात कोरोना लसीकरणाची सुरुवात होत आहे. कोरोनाची लस महाराष्ट्राला मिळाल्यावर सर्वप्रथम कोरोनायोध्यांना ती लस देण्याचा निर्णय सरकारकडून घेण्यात आला. त्याच पार्श्वभूमीवर मुंबईत आजपासून म्हणजेच 16 जानेवारीपासून लसीकरणाच्या प्रक्रियेला प्रारंभ होत असून, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी स्वत: लसीकरणाचे उद्घाटन केले.

मुख्यमंत्री उध्दव ठाकरे वांद्रे कुर्ला संकुलवरील कोव्हिड सेंटरवर हजर राहून लसीकरणाचे उद्घाटन केले. यानंतर संपूर्ण महाराष्ट्रात कोरोना लसीकरणाची सुरुवात होणार आहे. त्यासाठी बीकेसी कोव्हिड केंद्राचे नाव बदलून बीकेसी लसीकरण केंद्र करण्यात आले आहे. लसीकरणासाठी वेगळा प्रभागदेखील बनवण्यात आला आहे.

मुंबईत ठिकठिकाणी लसीकरणासाठी असे विभाग बनवण्यात आले असून तिथे लसीकरणाच्या प्रथम टप्प्याची सुरुवात होणार आहे. प्रथम टप्प्यात सर्व वैद्यकीय अधिकारी, कर्मचाऱ्यांना ही लस देण्यात येणार आहे.

मुंबईत लसीकरणासाठी ‘कोव्हिड एस’ अशी सिस्टीम तयार करण्यात आली आहे आणि त्यानुसार संध्याकाळपर्यंत ज्यांना ही लस दिली जाणार आहे, त्यासोबतच लस दिल्यानंतर काय काळजी घेणे गरजेचे आहे, याबद्दलचे मेसेजेस व्हिडीओद्वारे दाखवले जातील. मुंबईत एकूण 9 सेंटर कोरोना लसीकरण केंद्रे उभारण्यात आली आहेत. बीकेसी, राजावाडी, कूपर हॉस्पिटल,नायर हॉस्पिटल, केईएम हॉस्पिटल,बाबासाहेब आंबेडकर हॉस्पिटल कांदिवली, बांद्रा बाबा हॉस्पिटल आणि बी एम देसाई रुग्णालयांचा लसीकरण केंद्रामध्ये समावेश आहे.

Related Articles

Subscribe
Notify of
guest
0 Comments
Inline Feedbacks
View all comments