कारण

नामांतराचा गोंधळ, मनसेचा थेट बाळासाहेबांच्या नावाला विरोध

अनेक वर्षांपासून रखडलेल्या नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावर लक्ष केंद्रित करत आता हे प्रकरण, एका वेगळ्याच मागणीवरून प्रकाशझोतात आले आहे. नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांनी नुकतेच मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना “नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाचे हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे आंतरराष्ट्रीय विमानतळ असे नामकरण करण्याच्या मागणीचे” निवेदन दिले असताना मनसेने त्यावर आक्षेप घेतला आहे.

नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला बाळासाहेब ठाकरे यांचे नाव देण्याच्या मागणीला स्थानिक प्रकल्पग्रस्त मंडळीं आणि नेत्यांनी विरोध करत प्रकल्पग्रस्त नेते दि. बा. पाटील यांच्या नावासाठी आग्रह धरला आहे. आणि आता या नावाच्या वादात मनसेनेही आपला विरोध दर्शवत या वादात उडी मारली आहे. आज नवी मुंबईतील सिवूड येथे अधिकृत पत्रकार परिषद घेत मनसेचे नवी मुंबई शहर अध्यक्ष गजानन काळे यांनी आंतराष्ट्रीय विमानतळाला दि. बा. पाटील यांचे नाव देण्याची गरज स्पष्ट करणारे आशयाचे पत्र मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पाठवले असल्याचे सांगितले. सदर पत्रात ‘पालकमंत्री म्हणून अशी मागणी करताना नवी मुंबईकरांचा कानोसा घेणे आवश्यक होते, तो त्यांनी घेतला नाही’ याबद्दल खेद वाटल्याचे नमूद केले.

नवी मुंबईकरांचे मत स्व. दि. बा. पाटील यांना असताना एकनाथ शिंदे यांनी केलेल्या मागणीवर त्यांची सर्वसामान्यांशी नाळ तुटत चालली आहे तसेच मंत्री एकनाथ शिंदे यांनी आपली नाळ भांड्वलदारांशी जुळवून घेतली की काय ? असा सरळ प्रश्न मनसे शहरअध्यक्ष गजानन काळे यांनी विचारला आहे.

अनेक वर्षांपासून नवी मुंबईकरांमधून लोकनेते स्व. दि. बा. पाटील यांचे नाव नवी मुंबई विमानतळाला द्यावे अशी मागणी जोर धरत आहे. दि. बा. पाटील विधानसभेत चार वेळा आमदार, विरोधी पक्षनेता तसेच लोकसभेत दोन वेळा खासदार असल्याने दोन्ही सभागृहातील त्यांची कामगिरी अत्यंत प्रभावी होती. नवी मुंबईतील भूमिपुत्र, प्रकल्पग्रस्तांच्या त्यागाचे प्रतीक म्हणून नवी मुंबई विमानतळाकडे बघितले जाते. त्यामुळे लोकनेते स्व. दि. बा. पाटील यांचेच नाव विमानतळासाठी योग्य असल्याचे नवी मुंबईकरांचे मत आहे.

Related Articles

Subscribe
Notify of
guest
0 Comments
Inline Feedbacks
View all comments