खूप काही

आतापर्यंत खराब झाल्या 5 हजाराहून जास्त कोरोनाच्या लसी, कारण बघून व्हाल थक्क

16 जानेवारीपासून आत्तापर्यंत 5 राज्यांमध्ये 5 हजारपेक्षा जास्त कोरोना व्हॅक्सिन खराब झाल्या आहेत. त्रिपुरामध्ये तर 10 टक्के व्हॅक्सिन खराब झाल्याची माहिती समोर येत आहे.

भारताने कोरोनाशी लढण्यासाठी 16 जानेवारी पासून लसीकरणाला सुरुवात केली. सरकारने लसीकरण अभियान सुरू करण्यासाठी सगळे प्रयत्न केले. कोव्हिन ॲपद्वारे लसिकरणावर बारीक नजर ठेवणे असो, वा गरजेनुसार लस ऑफर करणे असो; पण एक गोष्ट ज्यावर जास्त लक्ष देण्याची गरज आहे, ती म्हणजे लसीकरणादरम्यान खराब होणाऱ्या व्हॅक्सिन.

16 जानेवारीपासून आत्तापर्यंत 5 राज्यांमध्ये 5 हजारांपेक्षा जास्त कोरोना व्हॅक्सिन खराब झाल्या आहेत. त्रिपुरामध्ये तर 10 टक्के व्हॅक्सिन लसी खराब झाल्या आहेत.

भारतात ज्या 2 व्हॅक्सिनला परवानगी मिळाली आहे, ते 10 ते 20 डोसच्या पॅकमध्ये येतात. ते पॅक उघडल्यानंतर व्हॅक्सिन 4 तासाच्या आत वापरणं गरजेचं आहे. मात्र लाभार्थी लोक 4 तासाच्या आत नाही येत, म्हणून हे व्हॅक्सिन खराब होत असल्याची माहिती वैद्यकीय अधिकाऱ्यांनी दिली.

त्रिपुरामध्ये आतापर्यंत खराब झाली 11% व्हॅक्सिन

त्रिपुराचे लसिकरण अधिकारी डॉ. कल्लोय रॉय यांनी दिलेल्या माहितीनुसार लाभार्थी 4 तासाच्या आत येत नाहीत आणि खूप वेळा लसीकरण करताना व्हॅक्सिन खराब होण्याची शक्यता जास्त असते.

अधिकाऱ्यांनी व्हॅक्सिन वाचवण्यासाठी त्यांच्या स्तरावरही खूप प्रयत्न करत आहेत. अधिकाऱ्यांनी लसिकरणासाठी त्या लाभार्थ्यांना बोलवलं, ज्यांना त्या दिवशी लस मिळणार नव्हती. त्यामुळे जे लोक त्यांच्या दिलेल्या वेळी लसीकरण करण्यासाठी नाही येऊ शकले, त्यांच्या नावे असलेले व्हॅक्सिन वाया जाऊ नये, अशीच अपेक्षा अनेकांची आहे. 16 जानेवारीपासून 100 पैकी आत्तापर्यंत फक्त 55 टक्के लोकांना लस देण्यात आली आहे.

10 % लस वाया

केंद्रीय स्वास्थ सचिव राजेश भूषण यांचं खराब होणाऱ्या व्हॅक्सिनवर म्हणणं आहे की आम्ही कोव्हीड-19 व्हॅक्सिन लसीकरणाची सुरुवात केली, तेव्हा देशभरात 10% वेस्टेजच अनुमान लावण्यात आलय. आम्ही सगळ्या राज्य-प्रदेशमध्ये व्हॅक्सिन वेस्टेजची खबरदारी घेण्याची सूचना पाठवली आहे.

आम्ही आमचे डिजिटल रेकॉर्ड सुस्थितीत ठेवण्याचा प्रयत्न करत आहोत. आणि त्याचबरोबर व्यवस्था हाताळणार्या अनेकांना याच प्रशिक्षणही देण्यात आल्याचे आरोग्य मंत्रालयाने स्पष्ट केलं आहे.

Related Articles

Subscribe
Notify of
guest
0 Comments
Inline Feedbacks
View all comments