आपलं शहर

मुंबईतील ‘या’ रुग्णालयांत होणार कोरोना लसीकरण, पुढे जाऊन शाळा आणि सभागृहे

येत्या 16 जानेवारीपासून देशभरासह मुंबईत लसीकरणाला सुरुवात होत आहे. यासाठी मुंबई महापालिकेच्या केईएम, सायन,नायर, व्ही. एन. देसाई, वांद्रे भाभा, कुर्ला भाभा, राजावाडी, डॉ. बाबासाहेब आंबेडकर रुग्णालय, बीकेसी कोरोना जंबो सेंटर आदी 9 रुग्णालयात लसीकरण करण्यात येणार आहे. या लसीकरणासाठी 72 बूथ असणार आहेत. प्रत्येकी एका बुथवर नर्ससह आरोग्य कर्मचारी असणार आहेत. तसेच, प्रत्येक 5 बुथसाठी 1 डॉक्टर असणार आहे.(Corona vaccination will be done at this Hospital in Mumbai)

एका बुथवर एका शिफ्टमध्ये किमान 100 जणांना लस देता येणार आहे. अश्या प्रकारे 2 शिफ्टमध्ये आरोग्य कर्मचारी लसीकरण करणार आहेत. विशेष म्हणजे एका दिवसात किमान 14 हजार लोकांना लस देण्याची आपल्या आरोग्य यंत्रणेची क्षमता असल्याची माहिती कार्यकारी आरोग्य अधिकारी मंगला गोमारे यांनी दिली आहे.

मार्च महिन्यापासून कोरोनाचा प्रभाव सर्वत्र दिसू लागला. मुंबईत कोरोनाने आपले विशाल जाळे पसरवले होत. जवळपास दहा महिन्यांच्या प्रतीक्षेनंतर अखेर कोरोनवर मात करण्यासाठी लस तयार करण्यात आली आहे आणि ती प्रभावी असल्याचे आरोग्य विभागाकडून सांगण्यात आले आहे. कोरोना रुग्णांचे जाळे भलेमोठे पसरले होते त्यामुळे आता लसीकरणाची मोहीम देखील मोठ्या प्रमाणात होणार आहे.

प्रत्येकापर्यंत लस पोहचली पाहिजे अशी सरकारची भूमिका असल्यामुळे लसीकरणासाठी राखून ठेवलेल्या 9 रुग्णालयात वाढ होईल. मुंबईत मोठ्या प्रमाणात लसीकरण करता यावे यासाठी येत्या काही महिन्यात शाळांमध्ये आणि विभागातील सभागृहे ताब्यात घेतली जाणार असल्याची माहिती सुरेश काकाणी यांनी दिली. तसेच पालिकेची रुग्णालये, दवाखाने, आरोग्य केंद्र आदी ठिकाणी पुढील काळात लसीकरण केले जाणार आहे.

Related Articles

Subscribe
Notify of
guest
0 Comments
Inline Feedbacks
View all comments