खूप काही

Delhi Mumbai Express way: मुंबईला जोडणार देशातील सगळ्यात मोठा एक्सप्रेस वे…

Delhi Mumbai Express way: भारतात लवकरच दिल्ली आणि मुंबई या दोन शहरांमध्ये सगळ्यात मोठा एक्सप्रेस वे बनणार आहे. याची लांबी 1305 किमी असणार आहे. जानेवारी 2023 पर्यंत हा एक्स्प्रेस वे पूर्ण होईल, अशी माहिती रस्ते आणि वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी दिली आहे. हा एक्सप्रेसवे गुजरात, राजस्थान, महाराष्ट्र, दिल्ली, मध्य प्रदेश अशा 5 राज्यांना जोडणार आहे.

भारताच्या विकासात अजून एक मोठा बदल या एक्स्प्रेस वेमुळे होणार आहे. 

 1305 किमी लांबी असलेल्या एक्स्प्रेस वे ला बनवण्यासाठी जवळ जवळ 90 हजार कोटी इतका खर्च येणार आहे. खुद्द केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी ट्विट करत ही माहिती दिली आहे आणि एक व्हिडिओदेखील शेअर केला आहे.

2023 पर्यंत मुंबई- दिल्ली एक्सप्रेसवे तय्यार

या एक्सप्रेस वेचे काम 2018 मध्ये सुरू करण्यात आले आहे तर आणि 9 मार्च 2019 रोजी या वेचे भूमिपूजन करण्यात आले आहे. 1000 किलोमीटरहून अधिकच्या करारास परवानगी देण्यात आली असून कामदेखील सुरू करण्यात आले आहे. दिल्ली ते दौसा विभाग जयपूरला जोडेल, जो जयपूर एक्स्प्रेस वेचा एक भाग आहे आणि वडोदराचा भाग अंकलेश्वर ते आर्थिक केंद्र बारुचला जोडेल. हे दोन्ही जंक्शनच काम 2021 मध्ये चालू होणार आहे.

2023 पर्यंत हा एक्सप्रेसवे बनून तयार होईल

– ५ राज्ये आणि एक इकॉनॉमिक हबला जोडून हा वे असेल.

– एक्सप्रेसवे गुजरात, राजस्थान, महाराष्ट्र, दिल्ली, मध्य प्रदेश या ५ राज्यांना जोडून जाईल.

– हा एक्सप्रेस वे जयपूर, किशनगड, अजमेर, कोटा, चित्तोडगड, उदयपूर, भोपाळ, उज्जैन, इंदूर, अहमदाबाद आणि सूरत या आर्थिक केंद्रांनाही जोडलेला असेल.

– हा एक्सप्रेसवे कमी कालावधीत उभारण्याच ध्येय नितीन गडकरीचं आहे.

– या एक्सप्रेसवेच्या काही गोष्टी ज्यावर तुम्हाला गर्व होईल…

– मार्ग बनल्यानंतर मुंबईपासून दिल्लीपर्यंतचे अंतर जवळपास 130 किमीने कमी होईल.

– दिल्लीहून मुंबईला जाण्यासाठी लागणारा वेळ 24 तासांऐवजी 12 तास एवढाच लागेल.

– याच्यामुळे प्रतिवर्षी जवळपास 85 कोटी किलोमीटर कार्बन डायऑक्साइडचे उत्सर्जन कमी होईल, जे 4 कोटी वृक्षांच्या लागवडी समान आहे.

– आजूबाजूला15 लाख झाडे लावली जाणार आहेत.

– हा आशियातील पहिला आणि जगातील दुसरा असा द्रुतगती मार्ग असेल, ज्याच्यावर जनावरांसाठी उड्डाणपूल बनवले जातील, ज्यामुळे प्राण्यांना जंगलामध्ये रस्ता ओलांडताना त्रास होणार नाही.

– या द्रुतगती मार्गामध्ये 3 भुयारी मार्ग आणि 5 उड्डाणपूल असतील.

– हा द्रुतगती मार्ग बनवण्यासाठी 5 लाख टनपेक्षा जास्त स्टील लागेल, जे 20हावडा ब्रिजच्या बरोबर आहे. 

– जवळपास 50 क्युबिक मीटर जमिनीला दुसऱ्या जागी हलवले जाईल, जे 60 लाख ट्रक फेर्यांद्वारे होईल.

 – याच्यामध्ये 35 लाख टन सिमेंट लागेल, जो देशाच्या एकूण उत्पादनाच्या 1 टक्का आहे.

– या द्रुतगती मार्गामुळे जवळजवळ 15 लाख मजुरीचे दिवस तयार होतील, ज्यामुळे हजारो लोकांना रोजंदारी मिळेल. 

-कामात वेग आणण्यासाठी आधुनिक तंत्रज्ञानाचा उपयोग होत आहे, ज्यामध्ये ड्रोनद्वारे सर्वेक्षण करण्यात येणार आहे.

Related Articles

Subscribe
Notify of
guest
0 Comments
Inline Feedbacks
View all comments