फेमस

MSRDCच्या सवलतीने वाहनचालकांच्या फास्टॅग खात्यांमध्ये परतावा जमा

महामार्गांवर फास्टॅग बंधनकारक असल्याचे केंद्रीय वाहतूक आणि महामार्ग मंत्रालयाने जाहीर केले आहे. या पार्श्वभूमीवर अधिकाधिक वाहनचालकांनी फास्टॅग वापरण्यास सुरुवात केली आहे. 15 फेब्रुवारी पर्यंत फास्टॅग लावणे बंधनकारक असणार आहे. फास्टॅगच्या वापरासाठी महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाने (MSRDC) एका मर्यादित कालावधीसाठी राजीव गांधी सागरी सेतू आणि मुंबई-पुणे-द्रुतगती मार्गावर बाईक, जीपव एसयूव्ही म्हणजे चारचाकी वाहनांना फास्टॅग वापरावर मोठी सवलत दिली होती.

11 जानेवारी ते 17 जानेवारी पर्यंत ही सवलत देण्यात आली होती. या सात दिवसात एकूण 3 लाख 45 हजार 155 वाहनांनी या सवलतीचा फायदा घेतला व या सवलतीतून परताव्यापोटी महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाने (MSRDC) 19 लाख 8 हजार 597 रुपये वाहनचालकांच्या फास्टॅग खात्यामध्ये जमा केले.

मुंबईतील वांद्रे-वरळी सागरी सेतूच्या पथकर नाक्यावरील सर्व मार्गिका फास्टॅग प्रणालीने अद्यावत करण्याचे काम हे 22 जानेवारीपर्यंत सुरू राहणार असून 26 जानेवारी 2021 पासून फास्टॅगधारक वाहनांना प्राधान्य देण्यात येईल. पथकर नाक्यांवर 100 टक्के फास्टॅग अंमलबजावणीसाठी एमएसआरडीसीची (MSRDC) तयारी अंतिम टप्प्यात आहे. त्यामुळे अधिकाधिक वाहनधारकांनी त्याचा फायदा घ्यावा असे विजय वाघमारे, (MSRDC) सह-व्यवस्थापकीय संचालक यांनी सांगितले.

फास्टॅग बद्दल या गोष्टी माहीत असणं आवश्यक!

● वेळ आणि इंधन बचतीसाठी फास्टॅग ही संकल्पना देशभरात राबविली जात आहे.

● कॅशलेस व्यवहार हा त्यामागचा उद्देश आहे. फास्टॅगसाठी ज्यांच्या नावे गाडी आहे त्यांचेच वैयक्तिक खाते फास्टॅगला जोडणे आवश्यक आहे.

● सर्व टोल नाक्यावर लवकरच, केवळ एक लेन सोडून, बाकी सर्व लेन्स फास्टॅग स्कॅन करणा-या यंत्रणेने सुसज्ज होतील.

● फास्टॅग मिळवू न शकलेल्या वाहनांसाठी वेगळी लेन आहे. त्याचाच वापर करावा अन्यथा फास्टटॅग लेनमधून गेल्यास दुप्पट टोल भरावा लागणार.

● दोन गाड्यांमध्ये 3 मीटरचे अंतर असावे जेणेकरून दुसऱ्या वाहनाला आपला टॅग स्कॅन होऊन आपले दुप्पट पैसे जाऊ नयेत.

 

Related Articles

Subscribe
Notify of
guest
0 Comments
Inline Feedbacks
View all comments