खूप काहीफेमस

खरंच नेताजींचा विमान अपघातात मृत्यू झाला का?

यापुढे नेताजी सुभाषचंद्र बोस यांची जयंती देशभरात ‘पराक्रम दिवस’ म्हणून साजरी केली जाईल, अशी घोषणा केंद्र सरकारकडून करण्यात आली. २३ जानेवारी हा दिवस देशात नेताजींचा जन्मदिवस म्हणून साजरा करण्यात येतो. भारताच्या स्वातंत्र्यलढ्यात मोलाचे योगदान देणारे सुभाषचंद्र बोस ज्यांना संपूर्ण देश नेताजी म्हणून हाक मारतो, त्यांनी १९३८ साली काँग्रेस पक्षाचे अध्यक्षपद देखील भूषविले होते. इंग्रज सरकारशी लढा देण्यासाठी ‘आझाद हिंद सेने’ ची स्थापना करणारे नेताजी आजही त्यांच्या कणखर नेतृत्व गुणांमुळे ओळखले जातात. अनेकांचे आदर्श असलेल्या नेताजींच्या मृत्यूचे गूढ अजूनही उलगडलेले नाही.

नेताजी भारताच्या स्वातंत्र्य संग्रामात मदत मागण्यासाठी जर्मनीलासुद्धा गेले होते. त्यांनी जपानच्या मदतीने आझाद हिंद सेनेची म्हणजेच इंडियन नॅशनल आर्मी ची स्थापना केली. परंतु, दुसऱ्या महायुद्धात जपानची हार झाल्याने इकडे आझाद हिंद सेनेनेही शरणागती पत्करली. आझाद हिंद सेना भारतात ब्रिटिशांसाठी फार मोठा धोका नव्हती. परंतु, या सेनेने आग्नेय आशियायी देशांमध्ये ब्रिटिश सरकारला जोरदार टक्कर दिली होती.

18 ऑगस्ट 1945 रोजी नेताजींचा जपानमधील फार्मोसा येथे विमान अपघातात मृत्यू झाला. पण त्यांच्या मृत्यूच्या ७५ वर्षानंतरही हा अपघात एक गूढ रहस्य आहे.

नेताजींचा मृत्यू संशयास्पद पद्धतीने झाल्याचे अनेकांचे म्हणणे आहे. त्यांच्या मृत्यूशी अनेक गोष्टींचे धागेदोरे जोडले गेले आहेत. म्हणूनच नेताजींच्या जयंतीनिमित्त आम्ही तुम्हाला त्यांच्या मृत्यूशी संबंधित काही तथ्ये सांगणार आहोत, जी तथ्ये तुम्हाला विचार करण्यास भाग पाडतील.

  • नेताजींचा भाऊ सरतचंद्र बोस आणि पुतण्या प्रदीप बोस यांनी नेताजींचा अपघाती मृत्यू कधीच मान्य केला नाही. आणि त्यांच्या अनेक चाहत्यांनीदेखील त्यांच्या विमान अपघाताच्या गोष्टीला अमान्य केले.
  • अनेकांची अशीही मान्यता आहे की, नेताजीं सन्यास घेऊन ‘गुमनामी बाबा’ च्या नावाने उत्तर प्रदेश येथे राहत होते तर त्यांचा मृत्यू 1985 ला फरिदाबाद येथे झाला.
  • ‘गुमनामी बाबा’ आणि सुभाषचंद्र बोस यांच्या चेहऱ्यात प्रचंड साम्य होते. त्यांनी आपण सुभाषचंद्र बोस असल्याचे मान्य केले असल्याच्या चार घटना देखील समोर आल्या होत्या परंतु देश हितासाठी त्यांनी अज्ञात राहणेच पसंत केले.
  • अनेकांना नेताजींची दुर्बिणीची जोडी, त्यांचे टाईपरायटर, घड्याळ,पाच दात आणि त्यांचा गोल भिंगाचा चांदीचा चष्मा या सर्व वस्तू देखील ‘गुमनामी बाबा’ च्या घरातून मिळाल्या होता.
  • जेव्हा नेताजींच्या मरणाची बातमी आली तेव्हा ”माझं मन मला नेताजी जिवंत असल्याचं सांगत आहे” असं म्हणत महात्मा गांधींनी ती बातमी नाकारली होती.

अशा अजूनही अनेक गोष्टी आहेत ज्यामुळे नेताजींच्या मृत्यूचे गूढ वाढत जातं, तुम्हाला अशाप्रकारची अजून काही माहिती माहित असेल तर आम्हाला नक्की कळवा.

Related Articles

Subscribe
Notify of
guest
0 Comments
Inline Feedbacks
View all comments