आपलं शहरकारण

ड्रायव्हरने एका झटक्यात पेटवल्या 5 करोडच्या 3 लक्झरी बस, कारण ऐकून व्हाल थक्क

ट्रॅव्हल एजन्सीच्या मालकाने आपला पगार थकवला या रागात बस चालकाने चक्क 3 करोडच्या 5 बस जाळल्याची माहिती मुंबईतून समोर येत आहे.

पहिल्यांदा या घटनेबाबत पोलिसांना चुकीची माहिती देण्यात आली, बसमधील बॅटरी ठीक करण्याचं काम सुरू होतं, त्यामुळेच कदाचित आग लागली असावी, असा प्रथम निष्कर्ष पोलीसांनी काढला होता, मात्र मागील महिन्यात अशा 2 घटना घडल्यामुळे पोलिसांना अस 5 बसच अचानक जळणे सौंसायस्पद वाटत होते.

२४ वर्षीय अजय सारस्वतने आपण काम करत असलेल्या ट्रॅव्हल एजन्सीच्या मालकाशी बदला घेण्यासाठी त्याच्या चक्क 5 बसला आग लावली आहे. मुंबई पोलिसांनी त्या चालकाला शनिवारी ताब्यात घेतलं असून एमएचबी पोलीस स्टेशनमध्ये संबंधितांची तक्रार नोंदवली आहे.

पोलीस अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार एका महिन्यात आत्माराम ट्रॅव्हल एजन्सीच्या 5 बसेसला आग लावली गेली.पहिली घटना 24 डिसेंबरला झाली, त्यानंतर 21 जानेवारीमध्येही अशीच घटना घडली होती, यावरून पोलिसांना संशय आला होता. फक्त आत्माराम एजन्सीच्या बसलाच का आग लागते, असाही सवाल पोलिसांसमोर उभा होता.या

आधी ट्रॅव्हल एजन्सीचे मालक आणि चालक अजय यांच्यात पगाराला घेऊन वाद झाला होता. त्या वादाच रूपांतर म्हणून चालकाने हा निर्णय घेतल्याचा संशय ट्रॅव्हल मालकाने घेतला होता, तो खरा ठरला.

Related Articles

Subscribe
Notify of
guest
0 Comments
Inline Feedbacks
View all comments