कारण

देशात दबदबा असलेल्या आदर्श गावात ‘या’ कारणामुळे होतेय निवडणूक?

राज्यातच नव्हे तर, देशात दबदबा असलेल्या नगर जिल्ह्यातील आदर्शगाव हीवरे बाजार आणि राळेगणसिद्धी येथे ग्रामपंचायत निवडणुका बिनविरोध करण्याचे प्रयत्न फसले आहेत. हिवरे बाजारांमध्ये तब्बल तीस वर्षांनी निवडणूक होत असून गावाचे प्रवर्तक आदर्श सरपंच आणि पद्माश्री पुरस्कार विजेते पोपटराव पवार यांना स्वत:लाही निवडणुकीला सामोरे जावे लागणार आहे. एक शिक्षक त्यांच्याविरुद्ध निवडणूक लढवत आहेत.(Elections are being held in the most ideal village in the country)

बिनविरोध निवडणुका घेणारे गाव म्हणून या दोन्ही गावांची ख्याती होती. राळेगणसिद्धीत 35 वर्षांची ही परंपरा गेल्या वेळेपासूनच मोडली गेली आहे. यावर्षी येथे निवडणूक होत असून गावातील तरूण पिढीला निवडणूक हवी आहे. त्याशिवाय आम्हाला लोकशाहीची प्रक्रिया कशी समजणार अशी विनंती त्यांनी ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांना केली होती. त्यावर अण्णा हजारे यांनी निवडणूक होऊ द्या, पण शांततेत पार पाडा अशा शब्दात संमती दिल्याचे सांगण्यात येते.

मुख्य म्हणजे यावर्षी पारनेर तालुक्याचे राष्ट्रवादीचे आमदार निलेश लंके यांनी ज्या गावात बिनविरोध निवडणूक होईल, त्या गावाला आमदार निधीतून 25 लाखाचा निधी देण्याची घोषणा केली होती. त्यावेळी पहिला प्रतिसाद राळेगणसिद्धीतून आल्याचे सांगण्यात आले होते. स्वतः अण्णा हजारे यांनी या योजनेचे कौतुक करून याचा प्रचार स्वतः करणार असल्याचे म्हटले होते. प्रत्यक्षात मात्र त्यांच्याच गावात निवडणूक घेण्याची वेळ आली आहे. तेथे नऊ पैकी दोन जागा बिनविरोध होऊ शकल्या बाकी निवडणूका निश्चित मानल्या जात आहेत.

हिवरे बाजारामध्ये सदर सर्वच्या सर्व म्हणजे सातही जागांवर निवडणूक होणार आहे. स्वतः पोपटराव पवार यांच्या वॉर्डात निवडणुकीला सामोरे जावे लागणार आहे. त्यांच्या विरोधात एका खासगी संस्थेतीतील शिक्षक म्हणून काम करणारे किशोर संभळ निवडणूक लढवणार आहेत. गावातील परंपरागत विरोधकांनी पोपटराव पवार यांच्या विरोधात दंड थोपटले दिसून येते.

मधल्या काळात गावासाठी काम करताना काही नाराजी असू शकते. त्यामुळे यावेळी निवडणूक बिनविरोध झाली नाही. शिस्त विरुद्ध बेशिस्त अशी ही लढत असले. विकासकामे हवीत की बेशिस्तीची मुभा, याचा निर्णय आता मतदारांनी घ्यायचा आहे. – पोपटराव पवार, सरपंच, हिवरे बाजार

तसेच आदर्शगाव असलेलं हिवरे बाजारातील अनेक सदस्यांनी पवार यांच्या विरोधातील पॅनलच्या उमेदवारांनी पोलीस संरक्षण मागितले आहे. गावातील राजकीय विरोधकांकडून जीवाला धोका असल्याने पोलीस संरक्षण मिळावे, अशी मागणी करण्यात आली आहे.

Related Articles

Subscribe
Notify of
guest
0 Comments
Inline Feedbacks
View all comments