कारणखूप काही

”तर याचे गंभीर परिणाम भोगावे लागतील”-राजू शेट्टी यांचा महावितरणसह राज्य सरकारला धमकीवजा इशारा

कोरोना काळात सर्व घरी असल्याने जास्त वीजेचा वापर झाल्याचे कारण देत ग्राहकांना भरमसाठ वीजबिल पाठवणाऱ्या महावितरण कंपनीने ग्राहकांना तात्काळ वीजबिल भरा नाहीतर वीजपुरवठा खंडित केला जाईल असं सांगितल्याने ग्राहकांना आता काय करायचे,असा मोठा यक्षप्रश्न पडला आहे. यावर प्रतिउत्तर म्हणून स्वाभिमानी शेतकरी पक्षाचे राजू शेट्टी यांनी जबरदस्तीने वीजबिल वसूल केल्यास त्याचे वाईट परिणाम भोगावे लागतील, असा धमकीवजा इशारा महाआघाडी सरकारला दिला आहे.

महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनीने सर्व भागातील कर्मचाऱ्यांना तात्काळ वीजबिलाची वसुली करण्याचे आदेश दिले आहेत. थकलेल्या वीजबिलाची रक्कम न भरल्यास त्यांचा वीजपुरवठा ताबडतोब बंद करण्यात यावा असे देखील निर्देश दिले आहेत. या सर्व प्रकाराचा आर्थिक आणि मानसिक भार हा ग्रामीण भागातील जनतेवर पडणार आहे. आधीच कोरोनामुळे ६ महिने घरात काहीही उत्पन्नाचे साधन नसल्याने सामान्य नागरिक त्रस्त झाला होता. आताकुठे जनजीवन सुरळीत होत असल्याचे चित्र दिसत होते. ग्रामीण भागातील अनेक कुटुंबावर जगायचे कसे असा प्रश्न असताना महावितरणने वाढीव वीजबिले पाठवली होती. त्यासंदर्भात अनेक तक्रारी करूनदेखील कोणतीही कारवाई करण्यात आली नाही. सरकारकडून दिलासा मिळण्याची आशा मनाला लावून बसलेल्या ग्राहकांना महावितरणने तात्काळ वीजभरणा करायला सांगून मोठा धक्का दिला आहे.

”ऊर्जा मंत्री नितिन राऊत यांनी केलेल्या वक्तव्यानुसार, दिवाळीपूर्वी सरकार वाढीव वीजबिलासंदर्भात योग्य तो निर्णय घेईल व ग्राहकांच्या सर्व तक्रारींचे निवारण करण्यात येईल असे सांगण्यात आले. परंतु त्यांनीही आपले हात वर केले आणि वीजबिलाच्या वसुलीचे आदेश दिले. याच निर्णयासाठी आम्ही थांबलो होतो का? ” असा सवाल माजी खासदार राजू शेट्टी यांनी केलाय.

”जर महावितरणने व राज्य सरकारने वीजबिलाच्या पूर्ततेसाठी घरगुती वीजपुरवठा बंद केला तर त्याचे वाईट परिणाम त्यांना भोगावे लागतील. त्याचे उत्तर आम्ही आमच्या पद्धतीने देऊ. जर तुमच्यात सामान्य ग्राहकांच्या घरातील वीजपुरवठा खंडित करण्याची हिम्मत असेल तर सरकारच्या मंत्र्यांनी गावागावात भेटी देऊन त्यांच्या वीजबिलाबद्दलची परिस्थिती आधी समजून घ्यावी,” असा इशारा राजू शेट्टी यांनी महावितरण कंपनीला दिला आहे. राज्य सरकारने वीजबिलासंदर्भात योग्य तो निर्णय घ्यावा, आम्ही सरकारशी दोन हात करण्यास तयार आहोत, असेही त्यांनी म्हटले आहे

Related Articles

Subscribe
Notify of
guest
0 Comments
Inline Feedbacks
View all comments