खूप काहीआपलं शहरफेमस

Exam : दहावी बारावी परीक्षेच्या तारखा झाल्या जाहीर

इयत्ता दहावी आणि बारावीच्या महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक मंडळातर्फे घेण्यात येणा-या परीक्षांच्या तारखा अखेर शालेय शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड यांनी जाहीर केल्या आहेत. आज वर्षा गायकवाड यांनी पत्रकार परिषद घेत याची माहिती दिली आहे. त्यामुळे आता गेल्या सात ते आठ महिन्यांपासून अभ्यासासाठी मुहूर्त शोधणाऱ्या विद्यार्थ्यांना परीक्षेसाठी तयारी लवकर सुरू करावी लागणार आहे. (Tenth and twelfth exam dates announced)

महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक मंडळाच्या बारावीच्या लेखी परीक्षा दिनांक 23 एप्रिल 2021 ते दिनांक 29 मे 2021 या कालावधीत घेण्यात येणार आहे. तसेच शालेय शालांत परीक्षा इयत्ता दहावीच्या लेखी परीक्षा दिनांक 29 एप्रिल 2021 ते 31 मे 2021 या कालावधीत घेण्यात येतील. यावेळी सदर परीक्षांच्या निकालाबाबत स्पष्टता देताना इयत्ता दहावीचा निकाल दहावी परीक्षेचा निकाल ऑगस्ट 2021 च्या शेवटच्या आठवड्यात जाहीर करण्यात येईल आणि बारावी परीक्षेचा निकाल अंदाजे जुलै 2021 च्या शेवटच्या आठवड्यात जाहीर करण्यात येईल असे वर्षा गायकवाड यांनी सांगितले.

कोरोनाच्या काळात अनेक शालेय विद्यार्थी शाळाबाह्य झाले आहेत अशा विद्यार्थ्यांचा शोध घेऊन त्यांना शाळेच्या प्रवाहात आणण्यासाठी शासन प्रयत्न करणार आहे व त्यासाठी विशेष मोहीम राबविण्यात येणार आहे असे शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड यांनी पत्रकार परिषदेत जाहीर केले. विद्यार्थी व पालकांनी या संदर्भात काही तक्रारी असतील तर स्थानीक शिक्षण अधिकारी वर्गाकडे संपर्क साधण्याचे आवाहन केले यावेळी वर्षा गायकवाड यांनी केले आहे.

Related Articles

Subscribe
Notify of
guest
0 Comments
Inline Feedbacks
View all comments