आपलं शहरकारणखूप काही

मुंबईतील शेतकरी मोर्चाला आणखी ‘पॉवर’, माजी कृषीमंत्री राहणार उपस्थित

दिल्लीत गेले 58 हून अधिक दिवस केंद्राच्या तीन कृषी कायद्यांविरोधात पंजाब, हरियाणा, येथील शेतकरी आंदोलन करत आहेत. केंद्रासोबत झालेल्या सर्व दहा बैठकीत काही निष्पन्न झालं नाही.

काही दिवसांपूर्वी सर्वोच्च न्यायालयाने या कायद्यांना स्थगिती दिली होती आणि त्यानंतर केंद्र सरकारने हे कायदे 18 महिन्यांसाठी स्थगित करणार असल्याचं स्पष्ट केलं. ह्या दरम्यान एक समिती स्थापन करून चौकशी करुन मग पुढील भूमिका ठरेल. असंही केंद्राने स्पष्ट केलं होत, मात्र कृषी कायद्याला स्थगितीपेक्षा रद्द करा, या ठाम भूमिकेवर शेतकरी आहेत.

आता याच आंदोलनास पाठिंबा म्हणून “संयुक्त किसान कामगार मोर्चा, महाराष्ट्र” तर्फे राजभवन वर धडक मोर्चा निघाला आहे. हा मोर्चा शेकडो किलोमीटरचा प्रवास करून, आता मुंबईतील आझाद मैदानात पोहोचला आहे. हा शेतकरी मोर्चा आज राजभवनावर धडकणार आहे.

शेतकरी मोर्चाला मिळणार आणखी ‘पॉवर’

राजभवनावर धडकणार्या या शेतकरी मोर्चाला आणखी पॉवर मिळणार आहे. याचं कारण म्हणजे, या मोर्चात दस्तुरखुद्द शरद पवार हे उपस्थित राहणार आहेत. “कृषी कायद्यांविरोधात शेतकऱ्यांचं जे आंदोलन सुरु आहे त्याला पाठिंबा म्हणून आम्ही या मोर्चात सहभागी राहणार आहोत” असं शरद पवार म्हणाले.

मिळालेल्या माहितीनुसार या मोर्चात महाविकास आघाडीतील काही नेतेही उपस्थित राहणार आहेत. दरम्यान, आझाद मैदानात शेतकऱ्यांची भव्य सभा देखील होणार आहेत. या सभेला अनेक शेतकरी नेते हजर राहणार असल्याचं म्हटलं जातंय.

Related Articles

Subscribe
Notify of
guest
0 Comments
Inline Feedbacks
View all comments