कारण

शेतकऱ्यांचा आवाज मुंबईत घुमणार, कृषी कायद्याविरुद्ध मोठी गर्जना

गेले 52 दिवस दिल्ली येथे संयुक्त किसान मोर्चाच्या नेतृत्वाखाली सुरू असलेल्या लाखो शेतकऱ्यांच्या अभूतपूर्व आंदोलनाच्या समर्थनार्थ व केंद्र सरकारच्या शेतकरी कामगार विरोधी धोरणांच्या विरोधात संयुक्त शेतकरी कामगार मोर्चाच्या नेतृत्वाखाली महाराष्ट्रात 23 जानेवारी रोजी नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्या जयंतीपासून व्यापक एल्गार सुरू करण्यात येत आहेत.

दिल्लीतील शेतकरी आंदोलनाला आणखी निर्णायक टप्प्यावर घेऊन जाण्यासाठी संयुक्त किसान मोर्चाने देशभर 23 ते 26 जानेवारी या काळात सर्व राज्यांच्या राजधान्यांमध्ये राज्यपाल भवनावर आंदोलन करण्याची हाक दिली आहे. या अनुशंगाने मुंबईत आंदोलन होईल.

कस असेल आंदोलन?

विविध संघटना 23 जानेवारी रोजी राज्यातील भागातून ट्रॅक्टर्स व इतर वाहनांमधून हजारो श्रमिक मुंबईच्या दिशेने निघतील.

24 जानेवारी रोजी मुंबई येथील आझाद मैदान येथे सर्वजण एकत्र येतील.

25 जानेवारी रोजी दुपारी 2 वाजता राज भवनाच्या दिशेने कूच करतील.

25जानेवारी रोजी शेतकरी कामगारांतर्फे आझाद मैदान येथे राष्ट्रीय ध्वजवंदन केले जाईल.

केंद्र सरकारने लागू केलेले तीन कृषी कायदे रद्द करावे, शेतीमालाला किमान आधार भावाचे संरक्षण देणारा कायदा करावा तसेच शेतकऱ्यांना न्याय मिळत नसेल तर खुर्च्या खाली करा असा पवित्रा महाराष्ट्रातील शेतकरी संघटनांनी घेतला आहे.

याच संपूर्ण परिस्थिती राज्य सरकारच्या कानी टाकण्यासाठी या सर्व संघटनांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार, महसूल मंत्री बाळासाहेब थोरात, पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांची भेट घेतली. तर राष्ट्रवाददी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार, महसूल मंत्री बाळासाहेब थोरात व आदित्य ठाकरे हे आंदोलनाला उपस्थित राहतील अस सांगण्यात आलं आहे. तर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचा देखील पाठिंबा या आंदोलनाला असणार आहे.

Related Articles

Subscribe
Notify of
guest
0 Comments
Inline Feedbacks
View all comments