आपलं शहर

आता FASTag नसल्यास वांद्रे-वरळी सी लिंकवर नो एन्ट्री

जर तुम्ही मुंबईत राहात असाल आणि तुम्ही कामानिमित्त वांद्रे-वरळी सी लिंकवरून ये-जा करत असाल तर ही बातमी तुमच्यासाठी महत्वाची आहे. कारण आता सरकारने 26 जानेवारीपासून वांद्रे-वरळी सी लिंक मार्गावर प्रवास करण्यासाठी FASTag बंधनकारक केले आहे. (FASTag compulsory on Bandra-Worli Sea link)

महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळ (MSRDC) ने मुंबईतील चार ते पाच टोल नाक्यांवर फास्टॅग सेन्सॉर लावण्याचे काम पूर्ण केले आहे. वांद्रे-वरळी सी लिंक आणि मुंबई-पुणे एक्सप्रेस वेवरदेखील (Mumbai-Pune Expressway) पूर्णपणे फास्टॅग सिस्टीम सुरु केली आहे. MSRDC ने याबाबत घोषणा केली आहे.

NHAI ने देखील देशातील सर्व टोल प्लाजांवर ही प्रणाली 1 जानेवारी पासूनच लागू केली आहे. केंद्रीय मंत्री नितिन गडकरी यांनी याआधीच म्हटलं आहे की पुढील दोन वर्षात देशातील सर्व टोल नाके बंद होतील.

फास्टॅग नसल्यास डबल टोल
MSRDC ने एक प्रेस रिलीज केलं आहे, ज्यात त्यांनी म्हटलंय की, “फास्टॅगविना आणि ब्लॅकलिस्ट टॅग असलेले वाहन जर FASTag लेन मधून गेलं तर त्यांच्याकडून डबल टोल आकारला जाईल.”

MSRDC ने असंही म्हंटलं आहे की, “वांद्रे-वरळी सी लिंक आणि मुंबई-पुणे एक्सप्रेस वेवर हायब्रिड लेन (hybrid lane) देखील असतील जिथे वाहनचालकांना टोल कॅशमध्ये भरता येईल. मात्र यावेळी त्यांना तिथे असलेल्या स्टॉलमधून फास्टॅग खरेदी करावं लागेल.”

फास्टॅग इथून खरेदी करा
फास्टॅग सर्व राष्ट्रीय महामार्गावरील टोल प्लाझा, RTO, बँकिंग मोबाईल ॲप, पेट्रोल पंप आणि पेटीएम (Paytm) वर खरेदी करू शकता. या सर्व विक्री केंद्रांची माहिती My FASTag ॲप, www.ihmcl.co.in या वेबसाईटवर किंवा 1033 या हेल्पलाईन नंबर वर कॉल करून मिळवू शकता.

Related Articles

Subscribe
Notify of
guest
0 Comments
Inline Feedbacks
View all comments