खूप काहीफेमस

FAU-G : सगळ्यात जास्त MB चा मोबाईल Game, डाउनलोडच्या आधी एकदा वाचाच..

पबजी गेम भारतात बॅन झाल्यानंतर काहीच दिवसात FAU-G हा मेड इन इंडिया गेम चर्चेचा विषय बनला होता. हा गेम कधी लॉन्च होणार याकडे सगळ्यांचंच लक्ष लागलं होतं. आज अखेर प्रजासत्ताक दिनाच्या निमित्ताने FAU-G हा गेम लॉन्च झाला आहे.

nCore Games या कंपनीने आपल्या ट्विटर हँडलवरून हा गेम लॉन्च झाल्याची माहिती दिली आहे. यासह कंपनीने एक व्हिडिओ देखील शेअर केला आहे ज्यामध्ये या गेमची थीम सांगण्यात आली आहे.

या टीझरमध्ये लडाख खोर्यातील गलवान खोरे दाखविण्यात आले आहे, जिथे चीन आणि भारत यांच्या सैनिकांमध्ये भांडण झाले. या टीझरमध्ये भारतीय सैनिक शत्रूशी लढताना दिसत आहेत. त्यात काही टास्क दिले जातील आणि तेथे जाऊन तुम्हाला दहशतवाद्यांचा सामना करावा लागेल, असं एकंदर टीझर पाहून लक्षात येत आहे.

ही तीच जागा आहे, जिथे भारतीय सैन्याने बरेच ऑपरेशन्स केले आहेत. गेममध्ये युद्धाशी संबंधीत गोष्टी दिसून येतात. असॉल्ट रायफल, Meele शस्त्र इत्यादींचा समावेश यामध्ये असेल.

असा कराल गेम डाउनलोड

हा गेम गूगल प्ले स्टोअरवर आता उपलब्ध करून देण्यात आला आहे. गेम डाउनलोड करण्यासाठी तुम्हाला FAU-G: Fearless and United Guards असं सर्च करावं लागेल. त्यानंतर सर्च रिझल्ट मधून तुम्हाला FAU-G वर क्लिक करायचं आहे. यानंतर हा गेम इन्स्टॉल करून तुम्ही या गेमचा आनंद घेऊ शकता. हा गेम साधारण 400MB च्या आसपास आहे.

Related Articles

Subscribe
Notify of
guest
0 Comments
Inline Feedbacks
View all comments