खूप काहीकारणफेमस

उद्यापासून अमिताभ बच्चनची कॉलर ट्यून बंद, ऐकू येणार वॅक्सिनची नवीन मोबाईल ट्यून

नमस्कार, हमारा देश और पुरा विश्व आज कोविड 19 की चुनौती का सामना कर रहा है, कोविड 19 अभी खतम नही हुआ है, एसेमे हमारा फर्ज है की हम सतर्क रहे, इसलीये जबतक दवाई नही तबतक कोई ढिलाई नही, करोनासे बचाव के लिये जरुरी है की, नियमित रुपसे हाथ धोना, मास्क पेहेनना, और आपसमे उचित दुरी बनाये रखना, याद रखीये दो गज दुरी मास्क है जरुरी! खासी बुखार या सास लेने मे कथानायि होणे पर हेल्पलाईन नंबर 1075 पर संपर्क करे!

हे सगळं तुमचं तोंडपाठ झालं असावं. कोरोनाकालावधीत प्रत्येक फोन लावण्याआधी मेगा स्टार अमिताभ बच्चन यांच्या आवाजात जनजागृती केली जात होती. जवळपास 10 ते 20 सेकंदाचा हा आवाज नवा असताना लोकांना भावला पण तोच कालांतराने लोकांची डोकेदुखी बनली होती. अमिताभ यांच्या आवाजात असणारी कॉलर ट्यून बदलण्याची याचिका दिल्ली उच्च न्यायालयात दाखल करण्यात आली होती परंतु त्यावर कोणतेही पाऊल उचलले गेले नव्हते.

परंतु आता मेगास्टार अमिताभ बच्चन यांच्या आवाजात ऐकू येणारा जागरूकता संदेश येत्या शुक्रवार (15 जानेवारी) पासून ऐकायला मिळणार नाही. कारण आता आपल्याला कोरोनवर दुसरीच कॉलर ट्यून ऐकायला मिळणार आहे. म्हणजे आता कोरोना लसीकरणा संदर्भात कॉलर ट्यून द्वारे जनजागृती केली जाणार आहे.

कोरोना सारख्या भयंकर महामारीत सरकार पाऊलोपाऊली खबरदारी घेण्याची सूचना करत होते. रस्त्यावर होर्डींगस लावून, रेल्वेतून प्रवास करताना, सोशल मीडियाद्वारे जनजागृती केली जात होती. स्वछता राखणे, सुरक्षित अंतर पाळणे आणि वेळोवेळी हाथ धुणे हाच कोरोनावरचा इलाज असल्याचे जनजागृतीतून सांगण्यात येत होते. पण आता कोरोनावर मात करण्यासाठी लस तयार करण्यात आली असून ती प्रवाभी आहे व सर्वांनी लसीकरण करून घ्यावे अशी जनजागृती केली जाईल. नवीन कॉलर ट्यून द्वारे देखील लसीकरणा विषयी माहिती दिली जाईल.

Related Articles

Subscribe
Notify of
guest
0 Comments
Inline Feedbacks
View all comments