कारण

गुगल मॅप आता रस्ता सांगणार आपल्या मराठी भाषेत

हे गुगल मॅप, मला पत्ता शोधून दे, अस जर तुम्ही आता मराठीत म्हणालात तर गुगल मॅप तुम्हाला मराठीत सर्व काही मार्गदर्शन करेल. होय, आता गुगल मॅप मराठीमध्ये उपलब्ध झाला आहे.

आता पर्यंत आपण कोणतेही ठिकाण शोधण्याचा पॉकेट ड्रायव्हर म्हणून गुगल मॅप चा सहारा घेत होतो. भाषा ही इंग्रजी मध्ये असल्यामुळे अनेक मराठी इंग्रजी अवगत नसलेल्या बांधवांना वापरण्यास कठीण जाई. गुगल मॅप मध्ये फक्त इंग्रजी भाषा असल्यामुळे ज्यांना ती भाषा कळत नाही त्यांची फार मोठी दमछाक होत असे. मात्र आता ही समस्या दूर झाली असून चक्क मराठीत आता तुम्हाला एखाद्या ठिकाणचा पत्ता शोधत येणार आहे.

गुगल मराठी भाषेसहित हिंदी, कन्नड, गुजराती, पंजाबी, उडिया, तमिळ, मल्याळम, तेलुगू, बांगला, इंग्रजी अश्या दहा हिंदुस्थानी भाषांमध्ये ऍप ला अपडेट केले आहे. या दहा भाषांसाठी ऑटोमॅटिक ट्रांसलिट्रेशन सिस्टिम (automatic transliteration system) म्हणजेच स्वयंचलित लिप्यंतरण प्रणाली सुरु केली आहे. त्यामुळे आता सर्व भाषेतील लोकांना गुगल मॅप चा वापर स्वभाषेत करता येईल. याने गुगल मॅपचा लोकांशी संबंध अधिक घट्ट होऊन निश्चित स्वरूपात गुगल मॅप ला फायदा होईल.

गुगल मॅप आतापर्यंत एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी जाण्यासाठी मदत करत असे. चालत जाणे, सायकल वर जाणे अथवा चारचाकी वाहनाने गेल्यावर किती वेळात आपण हव्या असलेल्या ठिकाणी पोहचू शकतो याची पुरेपूर माहिती गुगल देत असे. ऑफलाईन रस्त्या जतन करण्याचा तसेच शेअर करण्याचा पर्याय देखील गुगल उपलब्ध करून देत होता. शिवाय आजूबाजूला असलेली दुकाने, हॉटेल्स, हॉस्पिटल यांचीही माहिती आपल्याला गुगल मॅप द्वारे मिळत होती. विशिष्ट ठिकाण शोधण्यासाठी इकडे तिकडे रस्ता विचारण्यापेक्षा या युगात गुगल मॅपचा अधिक वापर केला जाई. अडचण फक्त भाषेची असल्यामुळे इंग्रजी भाषेशी अनोळखी असलेले व्यक्ती गुगल मॅपचा आधार घेऊ शकत नव्हते पण आता गुगल मॅपने ती ही सुविधा लोकांसाठी सुरू केली आहे.

Related Articles

Subscribe
Notify of
guest
0 Comments
Inline Feedbacks
View all comments