आपलं शहर

लेटलतिफांची उडवली सरकारने झोप; 2 वेळा उशीरा आल्यास पगार……

सरकारी कर्मसेवेत कार्य करणाऱ्या लेटलतिफांना आता चांगलाच धारेवर धरत सरकारने नव्यवर्षी त्यांची चांगलीच दमछाक केली आहे. राज्य सरकारने कामाच्या वेळेसाठी नवी नियमावली जाहीर केली आहे. कामाच्या वेळेचे भान न ठेवणारे तसेच वेळेबाबत टंगळमंगळ करणाऱ्यांची अक्षरशः झोप उडविली आहे. राज्य सरकारने जाहीर केलेल्या नियमावलीनुसार उशिरा येणाऱ्या कर्मचाऱ्यांचा पगार कापण्यापासून ते त्यांच्या हक्काच्या सुट्ट्या वजा करण्यापर्यंतच्या शिक्षेच्या तरतुदी करण्यात आल्या आहेत.

शासकीय सेवेत रुजू असणाऱ्या कर्मचाऱ्यांना विशिष्ट चौकटीत ड्रेस कोडचे बंधन नुकतेच राज्य सरकारने घातले असताना आता कर्मचाऱ्यांच्या कामावर येण्याच्या वेळेबाबत देखील ठोस निर्णय घेतला आहे. राज्य सरकारच्या सामान्य प्रशासन विभागाने कर्मचाऱ्यांच्या कामावर येण्याच्या वेळेबाबचे आदेश जारी केले आहेत. यामध्ये नक्की काय नियम व अटी आहेत पाहुयात सविस्तर.

● शासकीय सेवेतील कर्मचारी एका महिण्यात 3 वेळा कार्यालयात उशीरा उपस्थित राहिला तर सदर कर्मचाऱ्याची एका दिवसाची नियमित असलेली रजा वजा केली जाणार.

● सकाळी कार्यालयात उपस्थित राहण्यासाठी एका कर्मचाऱ्याला एका महिण्यात जास्तीत जास्त 2 वेळा दीड तास उशिरा येण्याची मुभा असते. तिसऱ्या वेळेस उशीर झाल्यास त्याची नियमित रजा ही वजा केली जाईल.

● एका महिण्यात 3 पेक्षा जास्त वेळ कामाला पोहचण्यास उशीर झाला तर त्याची एक दिवसाची सुट्टी कापली जाईल.

● एका महिन्यात कर्मचारी सहावेळा उशिरा उपस्थित राहिल्यास 1, नऊवेळा उशिरा आल्यास 2 रजा कापल्या जाणार.

● एका महिन्यातून 9 पेक्षा अधिक वेळा कामावर उशिरा आल्यास कर्मचाऱ्याला महिन्याला मिळणाऱ्या सुट्ट्यांमध्ये कपात केली जाणार आहे.

● विशेष म्हणजे ज्या अधिकाऱ्यांकडे महिन्यांच्या सुट्ट्या शिल्लक नाहीत आणि तरीही ते उशिरा कार्यालयात येत असतील तर त्या हिशोबाने त्यांचा पगार कापला जाणार आहे.

● ज्या अधिकाऱ्यांना सुट्ट्या कापू नये असे वाटत असेल तर ते कर्मचारी जर दोनपेक्षा अधिक दिवस एक किंवा दीड तास उशिराने ऑफिसात आले तर त्यांना उशिरापर्यंत कार्यालयात काम करावं लागणार आहे.

Related Articles

Subscribe
Notify of
guest
0 Comments
Inline Feedbacks
View all comments