फेमसएकदम जुनंखूप काही

Guinness World Record; वरळीतल्या चाळीत राहणाऱ्या ‘या’ मुंबईकराने बांधले जगातील सर्वात उंच हॉटेल

माणसाचं स्वप्न माणसाला खूप उंचावर घेऊन जाऊ शकतं या वाक्याचं प्रत्यय घडवून देणारे मुंबईतील अशोक कोरगावकर. जगातील सर्वात उंच हॉटेल डब्ल्यू मेरियॉट मार्क्वेस (W Marriott Marques) हे त्यांनी रचले असून या उत्कृष्ट कामगिरी बद्दल त्यांचा गिनेस वर्ल्ड रेकॉर्ड (Guinness World Record) मध्ये समावेश करण्यात आला आहे.

मुंबईतील वरळीमधील मिडलक्लास लोकांची चाळ आणि त्या चाळीत वाढलेले अशोक सध्या दुबईस्थित आहेत. गल्ली, लोकांचा गोंगाट, धुमधडाक्यात साजरे होणारे सण उत्सव आणि छोट्या छोट्या गोष्टींत आनंद शोधणारी आपली माणसं एव्हढेच विश्व जगणारे अशोक नेहमीच काहीतरी वेगळं करायचा विचार करत असे. अशोक यांना चित्रकलेची फार आवड होती.

1970 तो काळ, आणि मुंबई झपाट्याने प्रगती पथावर जात होती. अशोक त्यांच्या डोळ्यांनी चाळींचे रूपांतर भल्या मोठ्या उंच इमारतींत होताना पाहत असे. त्यावेळी त्यांना अश्या उंचीच्या गोष्टींची चटक लागली आणि आपल्या चित्रकलेतून देखील त्यांनी उंचच उंच इमारती रेखाटल्या. आपल्या चित्रातील गगनचुंबी, उंच इमारत एक दिवस आपण सत्यात उतरवू आणि आपण जगातली सगळ्यात उंच बिल्डींग बांधू अस स्वप्न त्यावेळी त्यांनी बाळगलं.

बिल्डिंग बांधण्यासाठी आर्किटेक्ट करावी लागत याची कल्पनाही नसलेले अशोक यांना एक दिवस असंच गल्लीतला अमुक माणूस आर्किटेक्ट झाला आणि तो अमेरिकेला नोकरीला जातोय हे कळाल. मग त्यांनी त्या अमुक आर्किटेक्ट मुलाची ओळख काढली आणि त्यांच्याकडून सगळी माहिती मिळवली. आता मी पण आर्किटेक्ट होणार असे त्यांनी मनाशी ठरवले.

पण त्यावेळी आर्टस्, सायन्स आणि कॉमर्स असे भविष्य घडविणारे तीनच विश्व असतात असा घरचे आणि चाळीतील लोकांचा समज होता. त्यामुळे आर्किटेक्ट होण्याच्या त्यांच्या स्वप्नाना केराची टोपली दाखविण्यात आली, घरच्यांकडून त्यांच्या इच्छांना दाबण्याचा प्रयत्न करण्यात आला. पण अशोक यांच स्वप्न आणि त्यांची इच्छाशक्ती अपार असल्याने ते या सर्वाला सामोरे गेले. परिस्थिती बिकट असताना पैसे जुळवून आर्किटेक्टच्या मुंबईतील रचना महाविद्यालयात प्रवेश मिळवला.

स्वप्न सत्यात उतरवण्यासाठी आर्किटेक्टची पाच वर्षे त्यांनी जितोड मेहेनत घेतली. शिक्षण घेत असताना त्यांना प्रेरणा देणारी अशी आर्किटेक्ट जीवनसाथीही भेटली.पेशाने दोघेही आर्किटेक्ट होते पण त्यावेळी भारतात पाहिजे तशी संधी त्यांना मिळाली नाही आणि म्हणून त्यांनी परदेशी राहणाऱ्या भावाच्या मदतीने बहारीनला पोहचले. तेथून त्यांनी दुबईला प्रवास केला. तिथे त्यांनी खरी आपल्या स्वप्नांना चालना देण्याची धडपड सुरू केली आणि त्यांचा प्रवास अखेर जगातील सर्वात उंच हॉटेल बांधत पूर्ण केला.

आपल्या यशाबद्दल सांगताना अशोक म्हणतात, “आयुष्यात कुठलेही काम पहिल्यांदा करताना ते नवेच असते. पण ते आव्हान स्वीकारले की ते पहिल्यांदा करत असल्याचे जाणवत नाही. 1980 मध्ये वरळीतून बहारिनला येताना व तेथून दुबईला जाणे, दुबईत स्वत:ची कंपनी स्थापन करणे, अमिरातसाठी रिसॉर्टचा आराखडा तयार करणे, हे सारे काही नवे होते. पण हे आव्हान मी दरवेळेस स्वीकारत गेलो आणि वरळीच्या चाळीतून सुरू केलेला प्रवास आज इथवर करू शकलो आहे.”

Related Articles

Subscribe
Notify of
guest
0 Comments
Inline Feedbacks
View all comments