खूप काही

फरहान अख्तरच्या घराबाहेर हाय व्होल्टेज ड्रामा, मुंबई आणि यूपी पोलीस आपापसात भिडले

‘मिर्झापूर’ वेब सीरिजवर दाखल झालेल्या प्रकरणाची चौकशी करण्यासाठी मिर्झापूर पोलीस मुंबई येथे दाखल झाले आहेत. यावेळी मुंबई पोलीस कर्मचाऱ्यांशी बाचाबाची झाली. मिर्झापूर पोलीस जेव्हा अभिनेता फरहान अख्तरच्या घरी चौकशीसाठी पोहोचले तेव्हा हा संपूर्ण हायहोल्टेज ड्रामा घडलाय.

वास्तविक नियमांनुसार इतर कोणत्याही राज्यातून महाराष्ट्रात येणाऱ्या पोलिसांना कोणत्याही प्रकरणाची चौकशी करण्यासाठी मुंबई पोलिसांच्या नोडल ऑफिसरची (गुन्हे शाखा डीसीपी) परवानगी घ्यावी लागते. गेल्या दोन दिवसांपासून मिर्झापूर पोलीस गुन्हे शाखेचे डीसीपी अकबर पठाण यांच्या कार्यालयात चक्कर मारत आहेत. परंतु डीसीपी अकबर पठाण उपलब्ध नसल्यामुळे मिर्झापूर पोलिसांना चौकशीची परवानगी मिळत नाही.

गुरुवारी सकाळी मिर्झापूर पोलिसांनी अंधेरी येथील क्राईम ब्रांच डीसीपी कार्यालय गाठले पण मुंबई पोलिसांकडून कोणताही पाठिंबा मिळाला नाही. यानंतर मिर्झापूर पोलीस अंधेरीमधून बाहेर आले आणि खार भागात पोहोचले आणि फरहान अख्तरची चौकशी करण्यासाठी गेले.

मुंबई पोलिसांना ही बाब लक्षात आल्यावर त्यांनी ती माहिती स्थानिक खार पोलीस ठाण्यात दिली. खार पोलीस ठाण्याचे कर्मचारी फरहान अख्तरच्या घरी पोहोचले आणि फरहान अख्तरच्या घराच्या दाराजवळ यूपी पोलीस आणि मुंबई पोलिसांत जोरदार बाचाबाची झाली. नियमांचे पालन केल्यानंतर योग्य परवानगी घ्या व त्यानंतर चौकशी करा, असा इशारा मुंबई पोलिसांनी दिला. या सर्व प्रकारानंतर मिर्झापूर पोलीस फरहान अख्तरच्या घराबाहेर पडले.

काय आहे मिर्झापूरचा वाद

मिर्जापूरमध्ये अरविंद चतुर्वेदी नावाच्या फिर्यादीने एफआयआर दाखल केला आहे. कोतवाली पोलीस ठाण्यात हा गुन्हा दाखल आहे. या प्रकरणी 17 जानेवारी रोजी गुन्हा दाखल करण्यात आला होता. मिर्झापूरची प्रतिमा, भावना भडकविणारी, एका विशिष्ट जातीला दुखापत करण्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
वेब सीरिजचे रितेश सिधवानी, फरहान अख्तर, भौमिक आणि अ‍ॅमेझॉन प्राइम यांच्याविरूद्ध हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Related Articles

Subscribe
Notify of
guest
0 Comments
Inline Feedbacks
View all comments