आपलं शहरकारणखूप काहीफेमस

ऐतिहासिक क्षण; दोन ठाकरे बंधुसह सर्वपक्षीय नेते जमणार एकत्र

शिवसैनिक आणि बाळासाहेब ठाकरे यांचे एक वेगळं आणि अतूट नातं आहे. उद्या हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांची जयंती आहे. याच जयंतीच्या पाश्र्वभूमीवर मुंबई महानगरपालिकेने उभारण्यात आलेल्या पुतळ्याचे अनावरण उद्या महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री उध्वव ठाकरे यांच्या हस्ते होणार आहे. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार, माजी मुख्यमंत्री आणि विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस आणि मनसे अध्यक्ष राज ठाकरे उपस्थित राहणार आहेत. त्यामुळे राजकीय जुगलबंदी रंगण्याची शक्यता आहे. थोड्याच दिवसापूर्वी मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर यांनी स्वतः भेटून मनसे अध्यक्ष राज ठाकरे, विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांना प्रत्यक्षात भेटून आमंत्रण दिले आहे.

दरम्यान, बाळासाहेब ठाकरे यांच्या पूर्णाकृती पुतळ्यासाठी शिवाजी पार्क, काळा घोडा, रिगल सिनेमा आणि गेट वे ऑफ इंडिया अशी चार ठिकाणांची पाहणी करण्यात आली. अखेर बाळासाहेब ठाकरे यांचा पुतळा गेट वे जवळच्या श्यामाप्रसाद मुखर्जी चौकात उभारण्यात आला आहे. बाळासाहेबांच्या जयंतीनिमित्त हे सर्व मान्यवर एकत्र आल्याने राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे पुन्हा एकत्र येतील, अशा चर्चा देखील रंगू लागल्या आहेत.

या कार्यक्रमाला महाराष्ट्र राज्याचे सर्व मंत्री शिवसैनिक व महसूलमंत्री बाळासाहेब थोरात, उद्योगमंत्री सुभाष देसाई, पर्यावरणमंत्री आदित्य ठाकरे, मुंबईचे पालकमंत्री अस्लम शेख तसंच विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर आणि इतर मानय्वर उपस्थित असणार आहेत.

यावेळी महापौर किशोरी पेडणेकर म्हणाल्या की, “खर तर बाळासाहेबांची जयंती आमच्यासाठी महत्वाचा दिवस आहे. 2015 साली बाळासाहेबांच्या पुतळा मंजूर झाला होता अखेर उड्या तो दिवस उजाडला आहे. सर्वपक्षीय नेत्यांना आमंत्रण दिले आहे. बाळासाहेबांच्या जवळचे असणारे शरद पवार, राज ठाकरे यांनाही आमंत्रण दिले असून उद्या सर्व नेते या कार्यक्रमाला उपस्थित राहणार आहेत.”

Related Articles

Subscribe
Notify of
guest
0 Comments
Inline Feedbacks
View all comments