खूप काही

शेवटच्या क्षणी विजय कसा मिळवायचा; Video पाहून तुम्हीही सॅल्युट कराल…

आपण आपल्या आजूबाजूला अशी अनेक उदाहरणे बघत असतो, जी आपल्याला प्रेरणा देत असतात. भारताची क्रिकेट मॅच असो की कोणता कबड्डी सामना असो, अनेकदा हे सामने शेवटच्या क्षणापर्यंत रंगतदार झालेले असतात आणि त्या सामन्याचा निकाल आपल्या अपेक्षेपेक्षा काही वेगळाच लागतो. असाच प्रसंग घडलाय एका धावपट्टूसोबत. (How to win at the last minute; You too will salute after watching the video)

@RexChapman या ट्विटर हँडलवरून एक व्हीडिओ शेअर करण्यात आलाय. आणि तो चांगलाच व्हायरल होत आहे. या व्हीडिओमध्ये अ‍ॅथलेटिक झिया हॉल्मन (Ziyah Holman) हिने स्पर्धेच्या शेवटी कसा बदल घडवलाय, हे स्पष्ट दिसून येतय. प्रतिस्पर्धींना शेवटच्यावेळी मागे कसं टाकायचं, याच सर्वोत्तम उदाहरण या व्हीडिओमध्ये दिसून येतं.

झियानचे सगळे प्रतिस्पर्धी तिच्या पुढे गेलेले असतात, मात्र शेवटच्या राउंडमध्ये झियानने केलेली कमाल तिथले प्रेषक कधीच विसरणार नाहीत. पुढे गेलेले सगळे स्पर्धक मागे टाकत झियानने मिळवलेला विजय संपूर्ण जगात व्हायरल होत आहे.

Related Articles

Subscribe
Notify of
guest
0 Comments
Inline Feedbacks
View all comments