भुक्कड

दादरच्या ‘या’ दुकानात मिळतात तब्बल वीस प्रकारच्या मिसळ!

मुंबई म्हंटली की धावपळ आली. धावपळ म्हंटली की अर्धवट भरलेलं पोट आलं. मुंबईकरांचं हेच अर्धवट भरलेलं पोट भरायला आम्ही तुम्हाला घेऊन आलो आहोत दादरला. मुंबईकरांची आवडती मिसळ खायला.आणि तेही एक दोन नाही बरं, तब्बल वीस प्रकारची मिसळ. आम्ही जर तुम्हाला सांगितलं की, दादरमध्ये एकाच ठिकाणी वीस प्रकारची मिसळ मिळते तर?

हो, हीच तर या दुकानाची खासियत आहे. अस्सल खव्वयांना मेजवानी म्हणून या मिसळ पावच्या दुकानात वीस प्रकारची मिसळ मिळते. अस्सल मिसळ प्रेमींनी तर इथे यायलाच हवं, ‘द हाऊस ऑफ मिसळ ‘ हे हॉटेल गौरव व त्यांची आई चालवते.हे हॉटेल दादर स्टेशनच्या लगत असलेल्या प्लाझा सिनेमाच्या अगदी बाजूला आहे. गौरव यांची आई स्वतः या संपूर्ण पदार्थांची तयारी करतात. इथे प्रत्येक जिल्ह्यानुसार मिसळ मिळते. पुणेरी मिसळ, मालवणी मिसळ, कोल्हापुरी मिसळ, नाशिक मिसळ अशी त्यांची नावे आहेत. तर इथे तरुणांसाठी खास मिसळीचे प्रकार आहेत. जसे, पाणीपुरी मिसळ, शेजवान मिशन, चीझ मिसळ व पेरी पेरी मिसळ.

‘आई शपथ माईंड ब्लोईंग’ अशी टॅग लाईन असलेल्या या हॉटेलची खासियत म्हणजे गौरव यांच्या आईच्या हातची स्पेशल तंदूरी मिसळ. पूर्णपणे स्वच्छ व हायजिनिक प्रकारे बनवल्या जाणाऱ्या या अनेक मिसळीची चव इथल्या ग्राहकांच्या जिभेवर कायम रेंगाळत असते. आईच्या हाताने घरी बनवलेल्या पदार्थांच्या चवीप्रमाणे लागणाऱ्या चवीमुळे इथले ग्राहक पुन्हा पुन्हा इथे येत असतात. काय मग, तुम्ही कधी जाताय दादरला वेगवेगळ्या मिसळ पावची चव घ्यायला? .

Related Articles

Subscribe
Notify of
guest
0 Comments
Inline Feedbacks
View all comments