खूप काही

“सौ शहरी… एक संगमनेरी” महाराष्ट्राच्या पठ्ठ्याने मारलं ऑस्ट्रेलियाचं मैदान

भारतीय संघाने आज (19 जानेवारी रोजी) नवा इतिहास रचला आहे. ब्रिस्टेनमध्ये झालेल्या रोमांचक सामन्यात अजिंक्य रहाणेच्या नेतृत्वात भारताने यश मिळवलं. ब्रिस्टेनमध्ये झालेल्या 5 कसोटी सामन्यांच्या मालिकेत भारताने 2-1 ने मालिका जिंकली आहे. ब्रिस्टेनमध्ये झालेला भारताचा हा पहिलाच मालिका विजय असल्याने सर्वदूर याची चर्चा रंगताना दिसत आहे. (India v Australia Test match)

कसोटी मालिकेचे नेतृत्व ज्या अजिंक्यने केलं, तो आहे महाराष्ट्रातल्या नगर जिल्ह्यातील संगमनेरमधला. आपल्या महाराष्ट्रातील मातीतल्या पठ्ठ्याने भारताला ही कसोटी मालिका विजयी करुन दिली आहे. ऑस्ट्रेलियाने पहिल्या डावात 336 तर दुसऱ्या डावात 294 धावांचं आव्हान भारतासमोर ठेवलं.


या सगळ्यांचा पाठलाग करताना भारतीय संघाने दमदार कामगिरी केली. अखेरीस दुसऱ्या डावात 20 चेंडूत 3 धावा असताना पंतने विजयी चौकार लगावला. भारताच्या विजयात शुभमन गिल आणि रिषभ पंतने मोठी कामगिरी केली आहे. त्यामुळे भारतीय संघाने चौथ्या विजयी सामन्यासह बॉर्डर गावस्कर ट्रॉफीवर आपलं नाव कोरलं आहे.

भारताने मिळवलेल्या या यशाच सर्वच स्तरातून कौतूक होत आहे, तर महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांसह अनेक दिग्गज नेत्यांनी अजिंक्य रहाणेचं कौतूक केलं आहे.

Related Articles

Subscribe
Notify of
guest
0 Comments
Inline Feedbacks
View all comments