खूप काही

IND vs ENG :भारतात रंगाणार लगान; भारत विरुद्ध इंग्लंड सामान्यांचं वेळापत्रक जाहीर

ऑस्ट्रेलियाविरुद्ध कसोटी सामन्यात सर्वात अविस्मरणीय विजय नोंदविल्यानंतर टीम इंडिया आता इंग्लंडविरुद्ध मालिका खेळणार आहे. कोरोनाची परिस्थिती आल्यानंतर देशात प्रथमच क्रिकेट मालिकेचे आयोजन केले जाणार आहे.

इंग्लंडच्या जवळपास दोन महिन्यांच्या दौऱ्यामध्ये, 4 सामन्यांची कसोटी मालिका, 5 सामन्यांची टी -२० मालिका आणि त्यानंतर 3 सामन्यांची वन-डे मालिका खेळवली जाईल. इंग्लंडचा हा दौरा 5 फेब्रुवारी ते 28 मार्च 2021 पर्यंत असेल.

सर्वात आधी चार सामन्यांची कसोटी मालिका खेळली जाईल. हा दौरा चेन्नईमध्ये 5 फेब्रुवारी पासुन सुरू होईल आणि 28 मार्च रोजी पुण्यात संपेल, जिथे तिसरा एकदिवसीय सामना खेळला जाईल. ही मालिका चेन्नई, अहमदाबाद आणि पूणे येथे खेळली जाईल.

अहमदाबादमध्ये पाच टी -20 सामने खेळले जातील. पहिल्या 2 कसोटी सामन्यांचे आयोजन चेन्नईत करणार आलय, तर तिसरा आणि चौथा कसोटी सामना अहमदाबादमध्ये होणार आहे. पाचही टी -20 सामने अहमदाबादमध्येच खेळले जातील. यानंतर, वनडे मालिका खेळण्यासाठी दोन्ही संघ पुण्यात जातील. अहमदाबादच्या मोटेरा येथे नव्याने बांधलेल्या स्टेडियम मध्ये 12 पैकी 7 सामने खेळले जातील.

भारत-इंग्लंड सीरीजचं पूर्ण वेळापत्रक

टेस्ट सीरीज
पहिली टेस्टः 5-9 फेब्रुवारी, ठिकाण- चेन्नई
वेळ – सकाळी 9.30 वाजता

दूसरी टेस्टः 13-17 फेब्रुवारी, ठिकाण- चेन्नई
वेळ – सकाळी 9.30 वाजता

तीसरी टेस्टः 24-28 फेब्रुवारी, ठिकाण – अहमदाबाद
वेळ- दुपारी 2.30 वाजता (डे-नाईट)

चौथी टेस्टः 4-8 मार्च
ठिकाण- अहमदाबाद
वेळ- सकाळी 9.30 वाजता

टी-20 सीरीज
पहिली टी20: 12 मार्च
ठिकाण – अहमदाबाद
वेळ – संध्याकाळ 7 वाजता

दूसरी टी20: 14 मार्च
ठिकाण – अहमदाबाद
वेळ – संध्याकाळ 7 वाजता

तीसरा टी20: 16 मार्च
ठिकाण – अहमदाबाद
वेळ – संध्याकाळ 7 वाजता
चौथा टी20: 18 मार्च
ठिकाण – अहमदाबाद
वेळ – संध्याकाळ 7 वाजता

पांचवी टी20: 20 मार्च
ठिकाण – अहमदाबाद
वेळ – संध्याकाळ 7 वाजता

वनडे सीरीज
पहिली वनडे: 23 मार्च
ठिकाण- पुणे
वेळ- दुपारी 1.30 वाजता

दूसरी वनडे: 26 मार्च
ठिकाण- पुणे
वेळ- दुपारी 1.30 वाजता

तीसरी वनडे: 28 मार्च
ठिकाण- पुणे
वेळ- दुपारी 1.30 वाजता

Related Articles

Subscribe
Notify of
guest
0 Comments
Inline Feedbacks
View all comments