खूप काही

भारतीय जवानांची मन जिंकणारी कर्तबगारी, Video पाहाल तर सलाम कराल!

जम्मू-काश्मीरमधील कुपवाडा जिल्ह्यातील एका रुग्णालयात जोरदार बर्फवृष्टीमुळे आपल्या नवजात मुलाबरोबर एक आई अडकून पडली. हे कळल्यानंतर त्या महिलेला आणि तिच्या नवजात बाळाला भारतीय सैन्याने शनिवारी त्यांच्या घरी पोहोचण्यास त्यांना मदत केली.

भारतीय सैन्याच्या “चिनार कॉर्प्स”ने ट्विटरवर सांगितले की, “सैनिकांनी जिल्ह्याच्या दर्पोपोरा येथील रहिवासी असलेल्या फारूक खसानाची पत्नी आणि नवजात मुलाला 6 किमी अंतरावर गुडघ्यापर्यंतच्या खोल बर्फातून त्यांना त्यांच्या घरी पोहोचण्यास मदत केली.”

“फारूख खसानाच्या पत्नीने काल इस्पितळात बाळाला जन्म दिला. रुग्णालयातून डिस्चार्ज मिळाल्यानंतर ते दोघेही बर्फवृष्टीमुळे तेथे अडकुण होते,” असं कुटुंबातील एका नातेवाईकाने सांगितलं. “28 RR बटालियनमधील लष्कराच्या अधिकाऱ्याने त्यांना घरी पोहचण्यास मदत केल्याने नातेवाईकांनी भारतीय जवानांचे आभार मानलेत.

 

Related Articles

Subscribe
Notify of
guest
0 Comments
Inline Feedbacks
View all comments