फेमसखूप काही

IPL 2021 : ए बी डिव्हिलर्सवर बरसले 100 करोड, धोनीच्या रांगेत परदेशी पाहूणा

रॉयल चैलेंजर्स बैंगलोरने Royal Challengers Bangalore स्टार फलंदाज ए बी डिव्हिलर्सला आयपीएलच्या १४व्या एडिशनसाठी रिटन केलं आहे. साऊथ आफ्रिकाचा फलंदाज ए बी डिव्हिलर्स हा भारतात सगळ्यात ज्यास्त पसंद केलेला विदेशी खेळाडू आहे. ए बी डिव्हिलर्स जेव्हा चौकार आणि षटकार लगावतो, तेव्हा मैदानावर एबीडी-एबीडीचा नारा लागत असतो. जसा कोणत्याही भारतीय फलंदाजसाठी नारा लागत असतो.

आयपीएलनंतर देशात त्याजी लोकप्रियता वाढली आहे. आयपीएलमधील कमाईच्या बाबतीतसुद्धा भारतीय दिग्गजांच्या एलाइट क्लबमध्ये ए बी डिव्हिलर्सचा समावेश झाला आहे. डिव्हिलर्स आयपीएलमधून 100 करोड कमावणारा पाहिला आंतररष्ट्रीय खेळाडू बनला आहे.

100 करोड क्लबमध्ये डिव्हिलर्सचा समावेश
आशेनूसार रॉयल चॅलेंजर्स बंगलोरने आपला स्टार खेळाडूला आयपीएल 2021 साठी रिटेन केलं आहे. 2018 च्या लिलावात डिव्हिलर्सला 11 करोडला आरसीबीने विकत घेतलं होतं. त्यानंतर लागोपाठ त्याला 3 वर्षे त्याच किमतीवर रिटेन केलं होतं. 2008 पासून आयपीएल खेळणाऱ्या डिव्हिलर्सने आतापर्यंत 100 करोडपेक्षा जास्त कमाई केली आहे, असं असणारा तो पहिला आंतररष्ट्रीय खेळाडू आहे. चेन्नई सुपर किंग्जचा कर्णधार महेंद्रसिंह धोनी, मुंबई इंडियन्सचा कर्णधार रोहित शर्मा आणि रॉयल चॅलेंजर्स बंगलोरचा कर्णधार विराट कोहली यांच्या एलाईट क्लबमध्ये आता डिव्हिलर्सचा समावेश झाला आहे.

आयपीएलमध्ये डिव्हिलर्स हे सगळ्यात विश्वासू फलंदाज आहे. संघाचे प्रदर्शन जरी सरासरी असले तरी डिव्हिलर्सने कोणत्याच सीझनमध्ये निराश केलेलं नाही. आयपीएलच्या करिअरमध्ये डिव्हिलर्सने आतापर्यंत 169 सामने खेळले आहेत. यादरम्यान त्यांनी 40.40 ची सरासरी आणि 151.91 च्या स्ट्राईक रेटने 4849 धावा बनवल्या आहेत, ज्यात 3 शतक आणि 38 आर्धाशतकांचा समावेश आहे.आयपीएल 2021 मध्ये एबीडीने 15 सामन्यांमधून 5 आर्धाशतकांच्या मदतीने 454 धावा केल्या आहेत.

डिव्हिलर्सची आतापर्यंतची कमाई

2021 रिटेन – आरसीबी – 11 करोड
2020 रिटेन – आरसीबी – 11 करोड
2019 रिटेन – आरसीबी – 11 करोड
2018  – आरसीबी – 11 करोड
2017 – आरसीबी – 9.5 करोड
2016 – आरसीबी – 9.5 करोड
2015 – आरसीबी – 9.5 करोड
2014 – आरसीबी – 9.5 करोड
2013 – आरसीबी – 5.8 करोड़
2012 – आरसीबी – 5.5 करोड
2011 – आरसीबी – 5.06 करोड
2010 – दिल्ली डेयरडेविल्स – 1.38 करोड
2009 – दिल्ली डेयरडेविल्स – 1.47 करोड
2008 – दिल्ली डेयरडेविल्स – 1.41 करोड

Related Articles

Subscribe
Notify of
guest
0 Comments
Inline Feedbacks
View all comments