खूप काही

IPL 2021: लिलावाची तारीख ठरली, या दिवशी लागणार खेळाडूंवर बोली!

इंडियन प्रीमियर लीग (IPL 2021) च्या नवीन हंगामापूर्वी सर्व फ्रँचायझींनी आपापल्या खेळाडूंची यादी जाहीर केली आहे. काही संघांनी अन्य संघांसोबत खेळाडूंची देवाणघेवाणही सुरू केली आहे. आता सर्व संघ फक्त लिलावाची वाट पाहात आहेत.

भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने (बीसीसीआय) अद्याप या छोट्या लिलावासाठी तारीख जाहीर केलेली नाही, परंतु अशी माहिती आहे की, 18 फेब्रुवारी ही तारीख जवळपास निश्चित झाली आहे.

पूर्वी हा लिलाव फेब्रुवारीच्या दुसर्या आठवड्यात होत असतो, परंतु आता तिसर्या आठवड्यात हा लिलाव होणार आहे. लीगचा नवीन हंगाम एप्रिल महिन्यात सुरू होणार आहे.

पुढच्या वर्षापासून आयपीएलची रचना बदलली जाणार आहे आणि त्यासाठी या वर्षाच्या अखेरीस किंवा पुढच्या वर्षाच्या सुरूवातीला मोठा लिलाव (मेगा लिलाव) होईल. यापूर्वीचा हा शेवटचा छोटा लिलाव आहे. अशा परिस्थितीत प्रत्येक संघाला स्वत: ला बळकट करण्याची संधी असते.

18 फेब्रुवारी रोजी लिलाव होणार, ठिकाणाचा निर्णय अद्याप नाहीच

सर्व संघांकडे खेळाडूंना कायम ठेवण्याची आणि सोडण्याची शेवटची तारीख 20 जानेवारीपर्यंत होती. हे काम संपल्यानंतर आता बीसीसीआयला लिलावाचे ठिकाण निश्चित करायचे आहे. तसेच लिलाव मसुद्यात कोणते खेळाडू आपले स्थान निश्चित करू शकतील, हेदेखील पाहिले जाईल. लिलावाच्या प्रश्नावर बीसीसीआयच्या एका अधिकाऱ्याने पीटीआय या वृत्तसंस्थेला सांगितले आहे की, “लिलाव 18 फेब्रुवारी रोजी होऊ शकतो. याकरिता जागेचा निर्णय अद्याप बाकी आहे.”

रिटेनर व्यतिरिक्त सर्व संघांकडे 4 फेब्रुवारीपर्यंत (ट्रेडिंग विंडो) वेळही असतो. ज्यामध्ये सर्व फ्रॅन्चायझी आपापसांत खेळाडूंचा व्यापार करू शकतात, म्हणजे एखाद्या फ्रेंचायझी दुसर्या फ्रँचायझीमधून एखादा खेळाडू खरेदी करू शकतात. दिल्ली कॅपिटल आणि चेन्नई सुपर किंग्ज यांनीही याआधी हा पर्याय वापरुन पाहिला आहे.

भारतात आयोजन केले जाईल?

बीसीसीआयचे अध्यक्ष सौरव गांगुली यांनी हे सामने, होम ग्राऊंडवर आयोजित करण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न केले जातील यावर जोर दिला आहे. COVID-19 महामारीमुळे आयपीएल 2020 संयुक्त अरब अमिरातीमध्ये झाली होती. पुढील महिन्यापासून इंग्लंड विरुद्ध होणार्या होम सीरिजच्या कार्यक्रमामुळे भारतात लीग पुन्हा सुरू होण्याचा मार्ग मोकळा होईल, अशी आशा आहे.

Related Articles

Subscribe
Notify of
guest
0 Comments
Inline Feedbacks
View all comments