आपलं शहर

तुमचा नंबरसुद्धा फेसबुक वरून विकला जातोय का? फेसबुकची सुरक्षितता धोक्यात

व्हाट्सअप प्रायव्हसी पॉलिसी संदर्भात झालेल्या घटनांनंतर आता फेसबुक आणि टेलिग्राम हे अँप देखील सुरक्षित नसल्याचं आढळून आलंय. फेसबुक वापरणाऱ्या सर्वच यूजर्ससाठी ही बातमी महत्वाची आहे.कारण फेसबुक वापरणाऱ्या काही व्यक्तीची माहिती त्यांच्या अकाउंट वरून चोरली जात आहे. त्यात तुमच्या अकाउंटचा देखील समावेश असण्याची शक्यता नाकारता येत नाही.

सूत्रांनी दिलेल्या माहिती प्रमाणे, काही हॅकर्स टेलिग्राम अँपचा वापर करून फेसबुक अकाउंटवरील माहिती चोरत आहेत. तुमचे जर फेसबुक आणि टेलिग्राम या दोन्ही सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर अकाउंट असतील तर ते तुमच्यासाठीही धोकादायक ठरू शकतं. फेसबुकवरील माहिती चोरण्याकरिता हे हॅकर्स टेलिग्राम च्या बॉट चा वापर करत आहेत. बॉट हे अँप्लिकेशन टेलिग्रामच्या सॉफ्टवेअर चा एक भाग आहे. त्याचाच वापर करून हे हॅकर्स फेसबुक युजर्स च्या अकाउंटवरील कॉन्टॅक्ट डिटेल बद्दलची माहिती गोळा करत आहेत.

मागील वर्षी झालेल्या डेटा ब्रीच मध्ये हाती लागलेल्या यूजर्सना हे हॅकर्स आधी लक्ष्य करत आहेत. २०१९ साली एका शोधकर्त्याने एका असुरक्षित सर्वरची पोलखोल केली होती. ज्यात ४२ करोड लोकांचा डेटा समाविष्ट होता. अमेरिका व ब्रिटन या देशातील १५ करोड लोकांचाही त्यात समावेश होता.

हॅकर्सनी वापरलेले टेलिग्राम बॉट अँप जवळपास १९ देशात वापरले जाते. बॉट बद्दल केलेल्या एका सर्वेक्षणात हे देखील समोर आले आहे की, ज्या व्यक्ती आपला मोबाईल नंबर गुप्त ठेवतात त्यांचा डेटा हे हॅकर्स हॅक करू शकत नाही. या सर्व प्रकारामुळे फेसबुक आणि टेलिग्राम बद्दल देखील डेटा सुरक्षेच्या बाबतीत यूजर्स संभ्रमात आहेत.

Related Articles

Subscribe
Notify of
guest
0 Comments
Inline Feedbacks
View all comments