खूप काही

दिल्लीत परत 6 जानेवारीनंतर थंडी वाढणार, तर मुंबईत काय आहे परिस्थिती?

उत्तर भारतातील अनेक राज्यात मागील काही दिवसांपासून हिवाळ्यासह पाऊसाच्या सरी बरसत आहेत. देशाच्या राजधानी दिल्लीत नववर्षाच्या तीसऱ्या दिवशीही पाऊस पडला. यासह पुढील 3 ते 4 तास असाच पाऊस पडणार असून 5 जानेवारी पर्यंत पाऊसाच्या हलक्या सरी बरसणार असल्याचा अंदाज हवामान खात्याने व्यक्त केला आहे.

7 जानेवारीपासून तापमान कमी होणार ज्यामुळे थंडीत वाढ होईल. दरवर्षी हिवाळ्यात उत्तरेकडील राज्यात कडक्याची थंडी पडते. त्यात यावर्षी पाऊसामुळे वातावरणात गारवा आणखी वाढला आहे. हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार दिल्ली, पंजाब, राजस्थान, हरीयाणा या राज्यात 4 जानेवारीला मध्यम स्वारुपाच्या पाऊसाची शक्यता आहे.

वेस्टर्न डिस्टर्बेंसमुळे दिल्लीच्या पश्मिच भागात, उत्तर प्रदेश, गाजियाबाद, नोएडा, हरीयाणा या राज्यात पाऊस सुरु आहे. हवामान खात्यानुसार आणखी काही तास उत्तर प्रदेश, हरीयाणा, राजस्थान, दिल्ली या राज्यात पाऊस असाच सुरु राहिल.

दिल्लीत हवेच्या गुणवत्तेत सुधारणा
पाऊस आणि वाऱ्यामुळे दिल्लीच्या हवेच्या दिल्लीच्या गुणवतेत सुधारणा झाली आहे. दिल्लीच्या हवेत प्रदुषणाचा स्तर हा मध्यम स्वरुपाचा आहे. राजधानीच्या वायु गुणवत्ता अर्थात (AQI) 148 इतका नोंदवण्यात आला आहे.

मुंबईत काय आहे परिस्थिती?

मुंबईत गेल्या वर्षीच्या प्रमाणात थंडीचे प्रमाण जास्त आहे. लॉकडाऊनमध्ये प्रदूषण कमी झाल्या कारणास्तव आद्रतेत वाढ झाली आहे. यावर्षी पावसानेही दमदार हजेरी लावल्याने चित्र मुंबईत दिसून आले.

मुंबईत 4 जानेवारी रोजी अनेक भागात ढगाळ वातावरण निर्माण झालं होतं. तर राज्यातल्या अनेक भागात पावसाने दमदार हजेरी लावली होती. राज्य हवामान खात्यानेही अंदाज वर्तवल्याने मुंबईसह आसपासच्या प्रदेशात पावसाच्या सरी कोसळण्याची धूसर शक्यता आहे.

Related Articles

Subscribe
Notify of
guest
0 Comments
Inline Feedbacks
View all comments