आपलं शहर

जिओ दन दना दन’ Jio च्या या प्लॅनमध्ये मिळणार रोज 3 GB डेटा…

जिओ आल्यापासून टेलिकॉम क्षेत्रात खूप बदल झाले आहेत. टेलिकॉम क्षेत्रात जिओच्या प्रवेशामुळे देशात 4G डेटा वापरात लक्षणीय वाढ झाली आहे. त्यामुळे सर्व विद्यमान टेलिकॉम कंपन्या ग्राहकांना स्वस्त डेटा प्लॅन्स देण्याचा प्रयत्न करत आहेत.

आज मात्र आम्ही तुम्हाला जिओच्या काही प्रीपेड प्लॅनबद्दल सांगणार आहोत, ज्यात दररोज यूजर्सला 3GB डेटा मिळणार आहे.

काय आहेत हे प्रीपेड प्लॅन?

1) 349 रुपयांचा प्रीपेड प्लॅन

जिओच्या 349 रुपयांच्या प्रीपेड मोबाइल फोन योजनेबद्दल बोलायचं तर, त्यात वापरकर्त्यांना दररोज 3GB डेटा मिळतो. तसेच 3GB डेटा मर्यादा पूर्ण झाल्यानंतर, डेटा स्पीड कमी होउन 64Kbps इतकी होणार आहे. ही योजना 28 दिवसांच्या वैधतेवर असणार आहे.

या योजनेत वापरकर्त्यांना एकूण 84GB डेटा देण्यात आला आहे. या प्रीपेड पॅकमध्ये अमर्यादित कॉलिंग आणि दररोज 100 SMS देखील फ्री मिळणार आहेत. यात ग्राहकांना जिओ ॲपचे फ्री सबस्क्रिप्शनही देण्यात आले आहे.

2) 401 रुपयांचा प्रीपेड प्लॅन

गेल्या वर्षी सप्टेंबरमध्ये आयपीएलदरम्यान जिओने 401 रुपयांचा प्रीपेड प्लॅन बाजारात आणला होता. यामध्ये दररोज 3GB डेटा वापरकर्त्यांना दिला जातो. ही योजना 28 दिवसांच्या वैधतेसह येते. यामध्ये 6 GB एक्स्ट्रा डेटाही वापरकर्त्यांना मिळणार आहे.

या प्लॅनमध्ये, वापरकर्त्यांना 28 दिवसांत एकूण 90 GB डाटाचा मिळणार आहे. याशिवाय या प्रीपेड पॅकमध्ये वापरकर्त्यांना दररोज अमर्यादित कॉलिंग आणि 100 SMS देखील मिळतात. याव्यतिरिक्त, जिओ अॅप्सचे फ्री सबस्क्रिप्शनही देण्यात आले आहे.

या पॅकचे वैशिष्ट्य म्हणजे त्यासह आलेल्या Disney+ Hotstar VIPचं सबस्क्रिप्शन. या योजनेत वापरकर्त्यास 399 रुपये किंमतीच्या या OTT प्लॅटफॉर्मचं एक वर्षाचं सबस्क्रिप्शन देण्यात आलं आहे.

3) 999 रुपयांचा प्रीपेड प्लॅन

जीओच्या 999 रुपयांच्या प्रीपेड मोबाइल प्लॅनबद्दल बोलायचं झालं तर, हा प्लॅन दररोज 3GB डेटा आणि 84 दिवसांच्या वैधतेसह दिला जातो. अशा परिस्थितीत, वापरकर्त्यांना या कालावधीत एकूण 252 GB डेटा मिळतो.

या प्रीपेड पॅकमध्ये अमर्यादित कॉलिंग आणि दररोज 100 एसएमएस देखील समाविष्ट आहेत. तसेच या योजनेत ग्राहकांना जिओ अॅप्सचे फ्री सबस्क्रिप्शनही देण्यात आले आहे.

&

;

Related Articles

Subscribe
Notify of
guest
0 Comments
Inline Feedbacks
View all comments