खूप काहीफेमस

ग्राहकांना “जिओ जी भरके’, मात्र कंपनीने कमवला बंप्पर नफा, ऐकून तुम्हीही थक्क व्हाल…

“जिओ जी भरके” म्हणत कमी दरात सेवा देऊन देशभर आपले जाळे पसरवणारी प्रसिद्ध दूरसंचार कंपनी रिलायन्स जिओ, मोठ्या नफ्यात असल्याचे समजत आहे. रिलायन्स जिओने त्यांचे आर्थिक निकाल जगजाहीर केले आहेत, कारण हा आकडा कमालीचा वाढला आहे. यात रिलायन्स जिओच्या तिसर्‍या तिमाहीमध्ये कंपनीला 3,489 कोटी रुपयांचा नफा झाला आहे. रिलायन्स जिओचा हाच आकडा मागील दुसऱ्या तिमाही पेक्षा तब्बल 15.5 टक्क्यांनी नफ्यामध्ये आहे. दुसऱ्या तिमाहीत हा नफा 3,020 कोटी रुपये इतका होता. (Jio Company share his profit information)

दुसऱ्या तिमाहीत जिओला 21,708 रुपयांचा नफा झाला होता, तोच आता तिसऱ्या तिमाहीमध्ये व्हॅल्यू एडिड सर्व्हिसेसकडून 22,हजार 858 रुपयांचा नफा झाला आहे. आर्थिक उलाढालीत रिलायन्स जिओ त्याच्या नफ्या विषयी माहिती देत 3,489 इतका नफा फक्त तिसऱ्या तिमाहीत झाल्याचे सांगते. म्हणजे मागील नफ्याची तुलना करता जिओच्या नफ्यात 5.3 टक्क्यांनी वाढ झाल्याचे दिसून येते.

जिओ कंपनीचा तिसर्‍या तिमाहीत एबिटा हा 8,483 कोटी रुपये आहे. तेच दुसऱ्या तिमाहीत 7,971 कोटी रुपये इतका होता. तुलनेने 43.6 टक्के एबिटा मार्जिन तिमाहीत वाढल्याचे इथे दिसून येते. कारण एबिटा मार्जिन दुसऱ्या तिमाहित 43.1 टक्के होता.एकूणच यात 46 बेसिस पॉईंटची वाढ झाली आहे.

रिलायन्स जिओने जाहीर केलेल्या आर्थिक नफ्याच्या माहितीवरून कंपनीचा फक्त आणि फक्त डबल पैसा वसूल कार्यक्रम सुरू असल्याचे दिसत आहे. फक्त तिसर्‍या तिमाहीत रिलायन्स कंपनीला 12 टक्के फायदा झाला आहे. (Jio Company earned bumper profit)

Related Articles

Subscribe
Notify of
guest
0 Comments
Inline Feedbacks
View all comments