खूप काहीफेमस

#JoeBidenIsNotMyPresident एका भारतीयामुळे जगात बनला ट्रेंडिंगचा विषय

हल्ली सोशल मिडीयावर कधी कोणता ट्रेंड सुरू होईल, कधी कोण काय बोलून जातं ते कळत नाही. सोशल मिडीयावर अनेक मजेशीर गोष्टी सतत होत असतात. अशीच एक मजेशीर गोष्ट अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडन यांच्या बाबतीत घडली आहे.

जो बायडन यांनी राष्ट्राध्यक्ष पदाची शपथ घेतल्यानंतर एक ट्वीट केलं. त्या ट्वीटमध्ये त्यांनी लिहीलं होतं, “It’s a new day in America.” आता यात तुम्ही म्हणाल काय मजेशीर आहे?

तर विषय असा आहे की, या ट्वीटवर अनेकांच्या कमेट्स आल्या. त्यातली एक कमेंट मात्र भाव खाऊन गेली. ही कमेंट होती प्रयाग तिवारी नावाच्या एका यूजरची.

राष्ट्राध्यक्ष पदाच्या निवडणुकीत भ्रष्टाचार झाल्याचं माजी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रंप वारंवार म्हणत होते. त्यातच अमेरिकेत “#JoeBidenIsNotMyPresident” हा हॅशटॅग ट्रेंड झाला.

जो बायडन यांनी केलेल्या ट्विटर यूजर प्रयाग तिवारी यानी उत्तर दिले की, “#JoeBidenIsNotMyPresident (जो बायडन माझे अध्यक्ष नाहीत).” जेव्हा एका यूजरने त्याला “ट्रम्प समर्थक आहे का” असे विचारले तेव्हा तिवारी सरळ म्हणाला, “नाही मी भारतीय आहे.”

तिवारीच्या अशा रिप्लायमुळे ट्वीटरवर हास्याची दंगल सुरू झाली आहे. लवकरच, #JoeBidenIsNotMyPresident ने ट्विटरवर ट्रेंड करण्यास सुरूवात केली.

Related Articles

Subscribe
Notify of
guest
0 Comments
Inline Feedbacks
View all comments