आपलं शहर

हे मुंबई विद्यापीठाचं टेनिस कोर्ट की गुराख्यांचं मैदान

मुबंई विद्यापीठाच्या कलिना संकुलातील मैदानाला आता गुरख्यांसाठी पडीक असलेलं मैदान म्हणून ओळख झाली आहे. संकुलातील मोकळ्या जागेवर रोज गुराख्यांसोबत गुरांचा वर्ग भरत असल्याचं चित्र आता स्पष्टपणे दिसत आहे. (Animal Husbandry in the Kalina Complex of the University of Mumbai)

हे मैदान एका टेनिस संघटनेला वापरण्यासाठी दिले आहे. मात्र टेनिस कोर्ट व्यतिरिक्त मोकळ्या मैदानाचा वापर होत नसल्याने तिथे गुराखी आपली गुरे चरायला आणत असल्याचा प्रकार उघडकीस आला आहे.

या गुरांना विद्यापिठाच्या आवारात प्रवेशच कसा मिळतो, असा सवाल मुंबई विद्यापिठातील सिनेट सदस्यांनी उपस्थित केला आहे. त्यामुळे आता या प्रकरणाला वेगळे वळण लागले आहे.

युवा सेनेच्या सिनेट सदस्यांनी या जागेची पाहाणी केली. विद्यापीठाची जागा संस्थेला किती वर्षासाठी दिली आहे, याबाबतचा करार काय आहे, ही माहिती सिनेट सदस्यांना हवी होती, म्हणून ही भेट होती, मात्र इथे येताच वेगळं चित्र सिनेट सदस्यांना पाहायला मिळालं.

गेली अनेक वर्षे मुंबई विद्यापिठाची ही जवळपास 7 एकर जागा टेनिस संघटना अधिकृतरित्या वापरत असल्याचा आरोपदेखील आता सिनेट सदस्य प्रदीप सावंत यांनी केला आहे. त्यामुळे विद्यापीठ आणि टेनिस संघटना यांच्यात कोणता करार झालाय, असा सवाल उपस्थित केला जात आहे.

Related Articles

Subscribe
Notify of
guest
0 Comments
Inline Feedbacks
View all comments