आपलं शहरकारणखूप काही

झाला रे झाला; कल्याणचा ‘पत्रीपूल’ अखेर तयार झाला

पत्रीपूल म्हटलं की आपल्याला सर्वात आधी आठवतं ते म्हणजे भलीमोठी वाहतूक कोंडी. पत्रीपूलावरून प्रवास करायचा म्हणजे कल्याण- डोंबिवलीकरांच्या अंगावर काटा यायचा; पण आजपासून मात्र कल्याण, डोंबिवलीकरांचा हा प्रवास सुखी होणार आहे.

कल्याण – डोंबिवली या दोन शहरांना जोडणारा पत्रीपूल आजपासून वाहतुकीसाठी सुरू झाला आहे. या पूलावर होणारी गर्दी लक्षात घेऊन येथे एक नविन पूल उभारण्यात आला आहे. या नविन पूलाचं उदघाटन मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांच्या हस्ते करण्यात आले, यावेळी पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे, नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे, खासदार श्रीकांत शिंदेंसह अनेक नेते उपस्थित होते.

पत्रीपूलाच्या खाली खूप रेल्वे लाईन्स आहेत. अशामुळे हा पूल रस्ते व रेल्वे वाहतूकीच्या दृष्टीने महत्त्वाचा आहे. या पूलाचा प्रश्र गेले काही वर्ष निवडणूकांमध्ये देखील गाजत होता. आज अखेर मुख्यमंत्र्यांच्या हस्ते या पूलाचं उदघाटन करण्यात आलं.

नव्या पत्रीपूलाच्या उदघाटन प्रसंगी पर्यावरण, राजशिष्टाचार मंत्री आदित्य ठाकरे, नगरविकास व जिल्ह्याचे पालकमंत्री एकनाथ शिंदे, शिवसेना खासदार डॉ. श्रीकांत शिंदे, मनसे आमदार राजू पाटील आणि इतर नेते मंडळी उपस्थित होते.

“काहीजण असं समजत होते की या पूलाचे काम रखडणार, मात्र तस न होता हे काम पूर्ण झालं आहे आणि आता कल्याण डोंबिवलीकरांनी केलेल्या सहकार्याबद्दल मी त्यांचा आभारी आहे, असं मत यावेळी बोलताना नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांनी मांडल आहे. यावेळी त्यांनी विरोधकांना देखील टोला लगावला आहे. ते म्हणाले, “काहींना असं वाटत होतं हे काम कसे होणार. पत्रीपूलाच्या कामाला उशीर झाला. पण हे काम पूर्ण झालं आहे.”

कल्याण स्मार्ट सिटी प्रकल्पाचंही उद्घाटन होणार आहे, आज कल्याणच्या सॅटीस प्रकल्पाचंही भूमीपूजन होणार आहे, त्यामूळे राजकीय जोडे बाजूला ठेवून विकास कामासाठी सर्वांनी एकत्र येण्याची गरज आहे, असं आवाहन देखील एकनाथ शिंदे यांनी केलं आहे.

हा पत्रीपूल जुना होता, एक इतिहास होता आणि भविष्यातदेखील इतिहास राहील. हा पुढील 100 वर्षे टिकेल असा पूल आपण बनवला आहे.” अस मत खासदार श्रीकांत शिंदे यांनी मांडलं आहे.

“कोण म्हणतं उशिरा झाला. तसं नाही लवकरात लवकर आपण हे काम केले आहे. कोपरी पूलाच्या आधी आपण या पूलाचं काम केलं आहे. आपण या पूलाचे काम 8 ते 9 महिन्यात केले आहे.” अस मत देखील खासदार शिंदे यांनी मांडलं आहे.

कसा तयार झाला पूल?
हैदराबादमध्ये दोन महिन्यांपेक्षा कमी कालावधीत 250 कामगारांच्या मदतीने या पुलाची गर्डर बांधली गेली. हैदराबादस्थित ग्लोबल स्टील कंपनीच्या म्हणण्यानुसार “गर्डरच्या कामासाठी कमीतकमी नऊ ते दहा महिने लागतात. तथापि, पत्रीपूल ROBची गरज लक्षात घेता, हे दोन महिन्यांपेक्षा कमी काळात तयार केले गेले.”

“पत्रीपूल गर्डर, जर्मनी व इटली येथून मागविलेल्या मशीनद्वारे तयार करण्यात आले आहे. काम वेळेत पूर्ण करण्यासाठी आम्ही रात्रंदिवस काम केले. लॉकडाऊन व पावसामुळे अनेक अडथळे आले, परंतु आम्ही काम पूर्ण केले,”असे कंपनीचे व्यवस्थापकीय संचालक ऋषी अग्रवाल यांनी सांगितले.

ही गर्डर, 25 कि.मी. लांबीच्या वेल्डिंग कामासह बांधली गेली आहेत आणि त्यात जवळजवळ 30,000 नट बोल्ट आणि 45,000 कनेक्शन होल आहेत. संपूर्ण पुलाचं वजन सुमारे 850 टन इतकं आहे, अशी माहितीदेखील अग्रवाल यांनी दिली आहे.

Related Articles

Subscribe
Notify of
guest
0 Comments
Inline Feedbacks
View all comments