फेमस

इंदिरा गांधींचा लूक आणि पंतप्रधान होण्याची चर्चा, कंगनाची नवीन भानगड!

बॉलीवूड मधील पद्मश्री पुरस्कार विजेती कंगना रनौत दिवसेंदिवस वादाच्या भोवऱ्यात खेळताना दिसत आहे. आपल्या वक्तव्यावरून प्रकाशझोतात येणारी कंगना आता नवीन घोषणा करत पुन्हा प्रेक्षकांचे लक्ष वेधून घेण्याचा प्रयत्न करत आहे. आपल्या सडेतोड वक्तव्यासह एक अभिनेत्री आणि दिग्दर्शक म्हणून तिच्या चित्रपटांचा लटही सुरूच आहे. नुकतीच कंगनाने थलाईवी चित्रपटाचं शूटिंग पूर्ण केले आहे. शूटिंग पूर्ण होताच कंगणाने लागलीच दुसऱ्या राजकीय चित्रपटाची घोषणा देखील केली आहे.

राजकीय वाद आणि कंगना हे सूड चांगलेच जुळलेले असताना देखील कंगना निडरपणे आपल्या पुढे येणाऱ्या राजकीय चित्रपटाची घोषणा करत पुन्हा एकदा प्रेक्षकांच्या भेटीला आली आहे. कंगना तिच्या आगामी चित्रपटात भारताच्या पहिल्या महिला पंतप्रधान (india president) इंदिरा गांधी (Indira gandhi) यांची भूमिका साकारणार आहे. याबद्दलचा एक 2010 मधील फोटो देखील तिने शेअर करत “हा चित्रपटाचा अधिकृत लूक नसून 2010 मध्ये फोटोग्राफर जतिन कंपानी बरोबर केलेला फोटोशूट आहे” असे तिने सांगितले.

आगामी राजकीय चित्रपटात कंगना माजी पंतप्रधान इंदिरा गांधी यांच्या भूमिकेत प्रेक्षकांना पहायला मिळणार आहे. या चित्रपटाची स्क्रिप्ट अंतिम टप्प्यात असल्याची माहिती तिने ट्विट द्वारे दिली. शिवाय, बायोपिक नाही तर हा एक भव्य कालावधीचा चित्रपट आहे जो माझ्या पिढीला सध्याच्या भारताच्या सामाजिक-राजकीय लँडस्केप समजण्यास मदत करेल असेही कंगना म्हणाली.

IMG 20210129 164118

आपल्या चित्रपटांच्या आणि अभिनयाच्या वेगळेपणामुळे बॉलीवूडमध्ये कंगणाने आपला डौलारा कायम टिकवला. मेहनतीवर कंगना हिने आतापर्यंत अनेक चित्रपट केले. त्यातील मणिकर्णीका हा चित्रपट चांगलाच गाजला. अभिनेत्री कंगना रणौत हिने याआधी तामिळनाडूच्या माजी मुख्यमंत्री जयललिता यांची भूमिका साकारली होती आता भारताच्या पहिला महिला पंतप्रधान इंदिरा गांधी यांची भूमिका साकारण्यास सज्ज झाली आहे. सोशल मीडियावर कंगनाच्या या नव्या चित्रपटाबद्दल चाहत्यांकडून खिल्ली उडवली जात आहे तर कंगना ही इंदिरा गांधींच्या भूमिकेत दिसणार असल्यामुळे पुढील पंतप्रधान म्हणून देखील चर्चेत आली आहे.

Related Articles

Subscribe
Notify of
guest
0 Comments
Inline Feedbacks
View all comments