आपलं शहरकारण

लसस्वी मुंबई; आज 93 टक्के लसीकरण यशस्वी, पण जेजे रुग्णालयात……

सर्व स्तरावरून कोरोना लसीबाबत संभ्रम व्यक्त केला जात असताना आता पुन्हा कोरोना लसीकरण पूर्वपदावर येताना दिसले. मुंबईत आज (दिनांक 22 जानेवारी) वैद्यकीय कर्मचाऱ्यांचा लसीला चांगला प्रतिसाद पहायला मिळाला. एकूणच आकडेवारी नुसार वैद्यकीय कर्मचाऱ्यांची लशीसाठी 3 हजार 852 जणांची नोंदणी झाली होती त्यापैकी 3 हजार 539 कर्मचाऱ्यांनी लस टोचून घेतली आहे.

मुंबईतील दहा रुग्णालयात लसीकरणाची मोहीम सुरू होती. त्यातील केईएम रुग्णालयात 685 जणांचे लसीकरण, टिळक रुग्णालयात 301, कूपर रुग्णालयात 368, नायर रुग्णालयात 378 , व्ही. एन. देसाई रुग्णालयात 72, डॉ. बाबासाहेब आंबेडकर रुग्णालयात 572, राजावाडी रुग्णालयात 517, वांद्रे भाभा रुग्णालयात 271 , बीकेसी कोविड सुविधा केंद्रात 350 , जेजे रुग्णालयात 25 अशी एकूण 3 हजार 539 जणांना लस देण्यात आली आहे.

16 जानेवारी पासून मुंबईत लसीकरणाला सुरुवात झाली. पहिल्या दिवशी 1 हजार 926 जणांनी लसीकरण केले. परुंतु त्यांनतर लसीकरणासाठी महत्वाच्या अश्या कोविन अँप मध्ये तांत्रिक बिघाड झाल्याने लसीकरण तात्काळ थांबविण्यात आले होते. 19 जानेवारीपासून पुन्हा लसीकरणाला सुरुवात करण्यात आली परंतु त्याला अल्प प्रतिसाद मिळाला. आता पुन्हा लसीकरणासाठी वैद्यकीय कर्मचाऱ्यांनी जोर धरला असून मुंबईत 93% लसीकरण आज पार पडले. यामध्ये सर्वाधिक लसीकरण हे बाबासाहेब आंबेडकर रुग्णालयात झाले तर सर्वाधिक कमी लसीकरण हे जेजे रुग्णालयात झाले.

Related Articles

Subscribe
Notify of
guest
0 Comments
Inline Feedbacks
View all comments