फेमसखूप काही

लसिथ मलिंगा मुंबई इंडियन्सच्या बाहेर, कोण घेणार यॉर्करची जागा?

फ्रेंचायझी क्रिकेटमधून लसिथ मलिंगाने निवृत्ती घेतल्याचं वृत्त व्हायरल होत आहे. त्याची आयपीएल पार्टनरशीप टीम मुंबई इंडियन्सने ही माहिती दिली आहे. मलिंगाने फ्रँचायझी क्रिकेटमधून निवृत्ती घेतल्याचं मुंबई इंडियन्सने सांगितलं आहे. त्यामुळे आयपीएल 2021 मध्ये तो दिसणार नाही, हे नक्की झालं आहे.

आयपीएलच्या सुरूवातीपासूनच लसिथ मलिंगा गतविजेत्या मुंबई इंडियन्ससोबत होता, संघाच्या अनेक विजयांमध्ये मलिंगांची मोठी कामगिरी आहे, त्यामुळे याचा फटका मुंबई इंडियन्सला बसणार आहे, हे नक्की.

आयपीएलमध्ये मलिंगाने सर्वाधिक विकेट्स घेतल्या होत्या. त्याने 122 सामन्यात 170 बळी घेतले आहेत. त्याची सर्वोत्कृष्ट कामगिरी 13 धावांसाठी पाच बळी घेणारी ठरली आहे. आयपीएल 2021 मध्ये मलिंगाने खेळण्यास नकार दिल्यानंतर मुंबई इंडियन्सने मलिंगाच्या जागी ऑस्ट्रेलियाचा वेगवान गोलंदाज जेम्स पॅटिनसनला संधी दिली आहे.

तत्पूर्वी, मुंबईने आपल्या निवेदनात म्हटले आहे की संघातून 7 खेळाडू बाहेर पडले आहेत. यामध्ये श्रीलंकेचा महान खेळाडू लसिथ मलिंगा, न्यूझीलंडचा मिशेल मॅकक्लेनाघन, ऑस्ट्रेलियाचा नॅथन कुल्टर नाईल आणि जेम्स पॅटिन्सन, गुयानाचा शेरफेन रुदरफोर्ड, लेगस्पिनर प्रिन्स बलवंत राय आणि वेगवान गोलंदाज दिग्विजय देशमुख यांचा समावेश आहे.

मुंबई इंडियन्समध्ये 7 जागा रिकामी

आयपीएल 2021 मध्ये मुंबईने आपला मूळ संघ कायम ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. यात कर्णधार रोहित शर्मा, यष्टीरक्षक फलंदाज क्विंटन डिकॉक, स्टार वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराह, ट्रेंट बोल्ट, अष्टपैलू कायरन पोलार्ड, हार्दिक पंड्या आणि कृणाल पंड्या यांचा समावेश आहे. पाच वेळच्या चॅम्पियन मुंबई संघात 18 खेळाडू असून त्यात ‘मिनी लिलावात’ भरलेल्या सात ठिकाणी खेळाडूंचा समावेश असू शकतो. पुढील हंगामात हा संघ चार परदेशी खेळाडूंची निवड करू शकेल, अशी शक्यता आहे.

Related Articles

Subscribe
Notify of
guest
0 Comments
Inline Feedbacks
View all comments