आपलं शहरफेमस

चलो हेरिटेज घुमने; पालिकेची हेरिटेज इमारत पर्यटकांसाठी खुली,पण फक्त ‘याच’ दिवशी

पर्यटकांची गर्दी आणि मुंबईतील ठिकाणे ही जोडी फार आधीपासून उदयास आलेली आहे. देशाची आर्थिक राजधानी असलेल्या मुंबईत पर्यटनासाठी अनेक मेजवानी स्थळे आहेत जे मुंबईला मोठ्या प्रमाणात आर्थिक उलाढालींसाठी मदत करतात. यातच, राज्याचा आढावा घेता पुण्यातील येरवडा कारागृह हे 26 जानेवारीपासून प्रेक्षकांसाठी खुले करण्यात आले आहे. आणि मुंबईत सर्वांची लक्ष वेधून घेणारी मुंबई महापालिका मुख्यालयाच्या हेरिटेज इमारत, जिथे प्रवेश मिळवण्यासाठी घाम गाळावा लागतो अश्या ठिकाणी फेरफटका आता मुंबईकरांना तसेच पर्यटकांना करता येणार आहे.

होय, आता पर्यटक तसेच आपले मुंबईकर फिरण्याच्या दृष्टीने पालिका मुख्यालयाच्या हेरिटेज इमारतीला फेरफटका मारू शकतात. पर्यटनाला वाव देणाऱ्या या महत्वकांक्षी उपक्रमाचा शुभारंभ आज (28 जानेवारी) मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते होणार आहे. प्रथमच गॉथिक शैलीतील 150 वर्षाच्या इमारतीचा वारसा उलगडला जाणार आहे. पर्यटकांना हा ऐतिहासिक पर्यटन क्षण फक्त शनिवार, रविवारी आणि सुट्टीच्या दिवशीच अनुभवता येणार आहे.

स्वप्ननगरी म्हणून ओळख असलेल्या मुंबईचा लेखा जोखा, सर्व कारभार हाताळणाऱ्या कारभारीन म्हणजेच मुंबई महापालिकेला प्राचीन काळाची बांधणी आहे. ब्रिटिश काळात रचलेली ही इमारत बाहेरून नेहमीच आकर्षित करते. अतिशय देखणी अशी ही वास्तू आता पर्यटनाच्या स्वरूपात मुंबईकरांना पहायला मिळणार आहे. देश विदेशात देखील ही वास्तू आकर्षित केंद्रबिंदू राहिली आहे, त्यामुळे या वास्तूचे पर्यटन घडावे यासाठी मुंबई महापालिका आणि महाराष्ट्र राज्य पर्यटन विकास महामंडळ यांमध्ये सामंजस्य करार 2020 च्या ऑक्टोबर मध्ये करण्यात आला होता. या पार्श्वभूमीवर आता ही हेरिटेज प्रत्यक्षात पर्यटनासाठी खुली होणारा आहे.

Related Articles

Subscribe
Notify of
guest
0 Comments
Inline Feedbacks
View all comments