खूप काही

तुमचे हे पैसे LIC फुकट वापरते, कारण तुम्ही विसरून जाता की……

भारतीय जीवन विमा महामंडळ (एलआयसी) ही भारतातील सर्वात मोठी विमा पुरविणारी कंपनी आहे. आयुष्यात भविष्याचा विचार करून प्रत्येकाने विमा काढणे गरजेचे आहे, जेणेकरून आपल्या कुटुंबियांचे जीवन सुरळीत चालेल. आरोग्य विमा, जीवन विमा तथा अन्य प्रकारच्या विमा पॉलिसी असुद्या, कुटुंबासाठी छोटीशी गुंतवणूक म्हणून विमा काढणे गरजेचे आहे.

बहुदा असं होतं की, आपण विमा काढतो आणि अर्धवट सोडून देतो. अथवा काढलेल्या विमाची सहकाऱ्यांना माहिती नसल्यामुळे त्याचा फायदा खऱ्या हकदाराला न होता थेट कंपनीला होतो. कारण, कल्पना नसल्यामुळे त्या विम्याचा दावा कोणीही करत नाही. अश्याच पॉलिसी धारकांचे एलआयसी च्या खात्यात कोट्यवधी रुपये पडून असतात, ज्याचा दावा कोणीही करत नाही. बहुदा पॉलिसीधारक विसरलेल्या पॉलिसीचे हे पैसे असतात. कधीकधी असेही घडते की दोन ते चार प्रीमियम भरल्यानंतर लोक पॉलिसी सोडतात आणि त्याचा फायदा कंपनीला होतो. एलआयसी प्रमाणेच देशात अनेक खासगी क्षेत्रातील कंपन्या लोकांचा विमा उतरवतात. एलआयसी प्रमाणेच त्यांच्या खात्यात देखील कोट्यावधी रुपये जमा असतात, ज्याचा दावा कोणीही करत नाही.

एलआयसीच्या खात्यात असलेली रक्कम डेथ क्लेम, मॅच्युरिटी क्लेम, सर्व्हायव्हल बेनिफिट्स, प्रीमियम परतावा किंवा नुकसान भरपाई क्लेमच्या रूपात जमा केली जाते आणि कालांतराने धारक हे विसरून जातात. एल आय सी द्वारा हे पैसे मिळवण्याचा एक विशिष्ट कालावधी असतो ज्यात हे आपल्याला परत मिळतात. कालावधी संपल्यास ही रक्कम अंक्लेम प्रॉपर्टी (Unclaimed Property) म्हणून घोषित केली जाते जी मिळवता येत नाही. आता अशी अर्धवट सोडून दिलेली अथवा, तुमचे पैसे एलआयसीमध्ये जमा झाले आहेत आणि जे तुम्हाला घेता आले नाहीत, ते जाणून घेण्याचा हा एक सोपा मार्ग आहे. ही पद्धत ऑनलाइन आहे ज्यामध्ये एका क्लिकवर संपूर्ण माहिती उपलब्ध आहे.

यासाठी तुम्हाला एलआयसीच्या संकेतस्थळावर जावे लागेल. दुसरा पर्याय म्हणजे आपल्याला शक्य असल्यास थेट कंपनी मध्ये जाऊन देखील आपण याची माहिती मिळवू शकतो. ऑनलाईन माहिती हवी असल्यास आपण https://licindia.in/Botom-Links/Ulala-Policy-Dues या वेबसाईटवर वर क्लिक करा. येथे क्लिक केल्यास एलआयसीचे एक पेज उघडेल जे आपल्याला Unclaimed and Outstanding amounts to Policyholders ची पुरेपूर माहिती देईल.

 

Related Articles

Subscribe
Notify of
guest
0 Comments
Inline Feedbacks
View all comments