आपलं शहर

सर्वसामान्यांसाठी लोकल सुरु, मात्र फायदा कोणाला?

करोना माहामारीमुळे सर्वसामान्यांसाठी गेले काही महिने बंद असलेली लोकल सेवा सरकारने टप्याटप्याने सुरू केली. सर्वात आधी अत्यावश्यक सेवेतील कर्मचाऱ्यांसाठी, नंतर महिला प्रवाशांसाठी आणि आता मात्र ज्या निर्णयाची सर्वसामान्यांना प्रतीक्षा होती तो अखेर झाला आहे. कारण येत्या सोमवार पासून म्हणजेच 1 फेब्रुवारी पासून सर्वसामान्यांसाठी लोकल सेवा सुरू होणार आहे. (Local services will resume for everyone from 1 February)

मात्र सर्वसामान्यांसाठी लोकल सेवा जरी सुरू केली असली तरी प्रवास करण्यासाठी मात्र दिलेल्या वेळेतच परवानगी देण्यात आली आहे. गर्दीच्या वेळा टाळून इतर वेळी सर्वांना प्रवासाची मुभा देण्यात आली आहे.

या वेळेतच प्रवासास मुभा:
सर्वसामान्यांना लोकल प्रवासासाठी मुभा तीन टप्प्यात दिली गेली आहे. पहाटे पहिल्या लोकल पासून ते सकाळी 7 पर्यंत, नंतर दुपारी 12 ते संध्याकाळी 4 आणि शेवटी रात्री 9 ते शेवटच्या लोकल पर्यंत सर्वसामान्यांना परवानगी देण्यात आली आहे.

पूर्णवेळ प्रवास करण्यास मुभा द्या:
लोकल मध्ये ठरलेल्या वेळी सर्वांना प्रवासाची मुभा देण्यात आल्यामुळे काही मुंबईकर मात्र समाधानी नाही आहेत. सर्वसामान्यांना लोकल प्रवासासाठी जरी परवानगी दिली असली तरी ती पूर्णवेळ द्यावी ही मागणी करण्यात आली आहे. त्यामुळे या निर्णयामुळे जरी काहीजण खुश असले तरी एक वर्ग असाही आहे की जो या निर्णयामुळे समाधानी नाही आहे.

यामुळे एक प्रश्न मात्र पडतो की, “सर्वसामान्यांसाठी लोकल सुरु, मात्र याचा फायदा कोणाला?”

मुंबईतील लोकल रेल्वे सेवा सर्वांसाठी सुरू करण्यासंदर्भात मुख्यमंत्री उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या अध्यक्षतेखाली अनेक बैठका घेण्यात आल्या होत्या. यासंदर्भातील निर्णय लवकरच घेण्यात येईल, अशीही माहिती मुख्यमंत्र्यांनी दिली होती, त्याचाच प्रत्येय आता येतोय. अनेक मुंबईकरांनी आता सपटकेचा निश्वास सोडल्याचंही दिसतय.

कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव अद्याप संपलेला नसल्याने गर्दी होणार नाही, अशा पद्धतीने लोकल सेवा सर्वांसाठी कशाप्रकारे सुरू करता येईल, याचं नियोजन केलं जात होतं. अखेर त्याबद्दल योग्य निर्णय करण्यात आला आहे. यादृष्टीने विविध पर्यायांवर बैठकही घेण्यात आली होती. त्यामुळे लोकलचं नियोजन कसं असणार आहे, हेच आता 1 फेब्रुवारीपासून समजणार आहे.

Related Articles

Subscribe
Notify of
guest
0 Comments
Inline Feedbacks
View all comments