खूप काही

आठवी नापास म्हणून सगळे चिडवायचे, त्यानेच केले 400 महिलांचे अकाउंट हॅक

सध्याच्या सोशल मीडियाच्या काळात वारंवार सायबर गुन्हे घडत असल्याचे समोर येत आहे, असाच एक मोठा सायबर क्राईम उत्तर प्रदेशात घडला आहे. एका आठवी नापास तरुणाने चक्क 400 महिलांचे सोशल मीडिया अकाउंट हॅक केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. (Lucknow’s Vineet Sharma hacked 400 women’s social media accounts)

तरुणींनी, महिलांनी सोशल मीडियावर share केलेले फोटो किती असुरक्षित असू शकतात, याच ताज उदाहरण उत्तर प्रदेशमधल्या लखनौमध्ये घडलं आहे. सोशल मीडियावरील अनेक खाजगी फोटो आपल्याकडे घेऊन संबंधित तरुणींना ब्लॅकमेल करण्याचा धक्कादायक प्रकार लखनौच्या सायबर क्राईने उघड पडला आहे.

लखनौमधील विनीत मिश्रा नामक तरुण हे काळे धंदे करत होता. एका तरुणीचे फोटो घेऊन तिला धमकी देत होता. तुझे आक्षेपार्ह फोटो माझ्याकडे आहेत, आणि ते जर तुझ्या घरच्यांना पाठवायचे नसतील, तर लवकर पैशांची सोय कर अशी मागणी विनितने संबंधित तरुणीकडे केली होती, मात्र संबंधित तरुणीने न घाबरता लखनौच्या सायबर क्राईमकडे याची तक्रार केली, त्यानंतर विनितच्या मुसक्या आवळण्यात आल्या.

विनीतची चौकशी केल्यानंतर लखनौच्या सायबर क्राईमच्या हाती धक्कादायक माहिती लागली. आठवी नापास असलेल्या विनितने सोशल मीडियावरील व्हिडीओ पाहून हॅकिंगचा प्रकार शिकला होता. फेसबुक facebook हॅक केल्यानंतर खासगी अकाउंटमधील फोटो विनीत डाउनलोड करायचा आणि त्यानंतर तेच फोटो मेसेंजरच्या साहाय्याने संबंधित तरुणींना पाठवून ब्लॅकमेल करायचा.

Related Articles

Subscribe
Notify of
guest
0 Comments
Inline Feedbacks
View all comments